मुंबई, दि. 28 : सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचा पुरवठा सुरळीत व्हावा व खाद्यतेल बियांच्या विक्रीला उठाव मिळावा व शेतकऱ्यांपुढील अडचण दूर व्हावी यासाठी शेंगदाणा, सोयाबीनसह खाद्यतेल बियांच्या मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी घेतला आहे. महाराष्ट्र डाळी, खाद्यतेल बिया आणि खाद्यतेल (साठा निर्बंध) (चतुर्थ सुधारणा) आदेश 2015 अन्वये या बियांच्या साठ्याची मर्यादा वाढविण्यात आली आहे.
राज्य शासनाने साठेबाजार रोखण्यासाठी डाळी, खाद्यतेल व खाद्यतेल बियांच्या साठवणुकीवर मर्यादा घातली होती. त्यामध्ये टरफल असलेल्या शेंगदाण्यासह सोयाबिनचा समावेश होता. मात्र, यामुळे व्यापारी शेतकऱ्यांकडील सोयाबीनची खरेदी करण्याचे कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा याचा फटका बसत होता. यासंबंधी आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत श्री. बापट यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. त्यानंतर श्री. बापट यांनी खाद्यतेल बियांच्या साठा मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय तातडीने घेतला आहे.
खाद्यतेल बियांच्या साठ्याच्या मर्यादेत वाढ करण्याच्या अधिसूचनेनुसार महानगरपालिका क्षेत्रातील घाऊकसाठी असलेली साठामर्यादा 2000 क्विंटलवरुन 20,000 क्विंटलवर तर किरकोळसाठी असलेली मर्यादा 200 क्विंटलवरुन 2000 क्विंटलवर वाढविण्यात आली आहे. इतर ठिकाणी घाऊकसाठी असलेली साठामर्यादा 800 क्विंटलवरुन 8000 क्विंटलवर तर किरकोळसाठी साठामर्यादा 100 क्विंटलवरुन 2000 क्विंटलवर वाढविण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment