बेस्ट कर्मचार्याना बोनस नाहीस - बेस्टचा संप अटळ - एसटीचाही संप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 October 2015

बेस्ट कर्मचार्याना बोनस नाहीस - बेस्टचा संप अटळ - एसटीचाही संप


मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबईची दूसरी लाइफ़लाइन असलेल्या बेस्टच्या कर्मचार्यानी बोनससाठी संपावर जाण्याची घोषणा केली असतानाच बेस्टची आर्थिक स्थिती पाहता बोनस / सानुग्रह अनुदान देने शक्य नसल्याचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.


बेस्टवर कर्ज असून बेस्ट तोट्यात आहे. दरवर्षी 160 कोटी रुपये व्याजाचे द्यावे लागत आहे. कर्मचार्यांचे पगार देता यावेत म्हणून दरवेळी कमी कालावधीचे कर्ज घ्यावे लागत आहे. बेस्टला पालिकेने 1600 कोटी रुपये कर्ज दिले आहेत त्याची परतफेड करावी लागत आहे.

सन 2011-12 पर्यन्त बोनस / सानुग्रह अनुदान दिले जात होते. परंतू बेस्टची आर्थिक परिस्थिती पाहता गेल्या 3 वर्षात बोनस देण्यात आलेला नाही. बोनस द्यायचा असल्यास 47 कोटी रुपये खर्च होणार आहेत सध्याची परिस्थिती पाहता ही रक्कम देणे शक्य नसल्याचे जगदीश पाटील यांनी सांगितले. कर्मचार्यानी बेस्टची आर्थिक परिस्थिती पाहून सहकार्य करावे आणि कर्मचार्यानी संपावर जाऊ नए असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

बेस्ट कर्मचार्यानी 26, 27, 28 ओक्टोबर रोजी सत्यागृह आन्दोलन करणार आहेत. हे आंदोलन म्हणजे बंद असणार आहे. एकीकडे बंद केला जाणार असताना  बोनस मिळणार नसल्याचे महाव्यवस्थापकानी स्पष्ट केले असल्याने बेस्ट 3 दिवस बंद राहणार हे स्पष्ट झाले आहे. 

एस टी चे कर्मचारी ही संपावर जाणार-----------------------------
एमएसईबी प्रमाणे 25 टक्के पगारवाढीच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी 29 ऑक्टोबरला पुणे येथे शंखानाद मेळाव्याचे आयोजन केल आहे. महाराष्ट्र एस टी वर्कर्स कांग्रेस (इंटक) संघटनेने या आंदोलनात पुढाकार घेतला असून आतापर्यन्त 72 हजारहून अधिक कर्मचार्यानी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. पुण्यातील शंखनादानंतर ही 25 टक्के पगारवाढीची मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करत संपाचे हत्यार उपसण्याचा इशारा महाराष्ट्र एस टी वर्कर्स कोंग्रेस (इंटक) चे अध्यक्ष आमदार जयप्रकाश छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

Post Bottom Ad