कोंग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळी – लाटणे मोर्चा... - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 October 2015

कोंग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळी – लाटणे मोर्चा...

मुंबई कॉंग्रेस आणि मुंबई महिला कॉंग्रेसच्या वतीने डाळी, कडधान्ये व भाज्यांच्या महागाई विरोधात थाळी – लाटणे मोर्चाचे आयोजन मंगळवार दि.२० ऑक्टोबर, २०१५ रोजी दुपारी १२.०० वाजता करण्यात आलेले आहे.  
थाळी – लाटणे मोर्चाची सुरुवात बांद्रा पूर्व - खेरवाडी सिग्नल येथून होईल व जिल्हाधिकारी कार्यालय येथे समाप्त होईल. सदर मोर्चात मुंबई महिला कॉंग्रेस थाळी – लाटणे वाजवून निषेध जाहिर करणार आहे, तसेच मुंबई कॉंग्रेस महागाई विरोधातील निषेधाचे फलक दाखवून निषेध जाहिर करणार आहेत.

     

तुरडाळ पाकिस्तानात ७० रुपये, बांगलादेशात ६५ रुपये, नेपाळ मध्ये ६८ रुपये, बर्मा मध्ये ७२ रुपये, श्रीलंकेत ६४ रुपये आणि भारतात २००हुन अधिक रुपयात मिळते आहे.  UPA सरकारच्या कालावधीत डाळींचे दरवाढ झाली तेव्हा भाजपाचे खासदार संसदेबाहेर निषेध करीत होते, आता भाजपा सरकारच्या कालावधीत भारतात डाळींच्या किमती गगनाला भिडत असताना निषेध करणारे भाजपाचे खासदार आता कुठेही दिसत नाही, असा आरोप मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला...

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महागाईला डायन असे मोदीजी म्हणायचे आणि आता पंतप्रधान होऊन दीड वर्ष झाली परंतु महागाई कमी न होता अधिकच वाढत आहे, याला मोदीजी विकास म्हणणार की अच्छे दिन म्हणणार, असे मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.डाळी, कडधान्ये व भाज्यांच्या महागाईचा जाहिर निषेध करण्याकरिता जास्तीत जास्त मुंबईकरानी थाळी – लाटणे मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले आहे.   

सदर थाळी – लाटणे मोर्चाचे नेतृत्व मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आणि मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा शीतल म्हात्रे करणार आहेत. तसेच कॉंग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते, माजी खासदार, आमदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, नगरसेवक/ नगरसेविका आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत

Post Bottom Ad