लाचखोर पालिकाअधिकाऱ्यांना पकडून देणाऱ्या पाल यांच्या उपोषणाकडे आयुक्तांचे दुर्लक्ष - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 October 2015

लाचखोर पालिकाअधिकाऱ्यांना पकडून देणाऱ्या पाल यांच्या उपोषणाकडे आयुक्तांचे दुर्लक्ष

मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगर पालिकेच्या एस इभागातील अधिकाऱ्यांनी रामदुलार पाल यांच्या घराची उंची जास्त आहे असे सांगून कारवाई करण्यासाठी नोटीस बजावली होती. हि नोटीस रद्द करावी म्हणून लाच मागणाऱ्या पालिका अभियंता आणि त्याच्या दलालाला लाच लुचपत विभागाकडून पकडून दिले होते. याचा राग मनात ठेवून पाल यांचे घर टोचण्यात आले. आपले तोडलेले घर पुन्हा बांधून मिळावे म्हणून पाल यांनी पत्रव्यवहार करूनही कोणताही प्रतिसाद पालिका देत नसल्याने पाल यांनी मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पाल यांनी केला आहे. 


रामदुलार पाल हे भांडुपच्या तुळशेतपाडा येथे राहतात. ते राहत असलेली जागा १६ सप्टेंबर १९७६ साली महाराष्ट्र शासनाने गलिच्छ वस्ती म्हणून जाहिरी केली आहे. रामदुलार पाल यांच्याकडे ते राहत असलेल्या जागेवरील १९९४ पूर्वीचे पुरावे आहेत. या वस्तीमधील इतर रहिवाश्यांनी येथील स्थानिक गुंड आणि पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून ३० फुटाची घरे बांधली आहेत. पाल यांनीही आपले घर पालिका अधिकारी आणि स्तःनिक गुंडाला भिक न घालता १९ फुटाचे केले. याची तक्रार पालिकेकडून तक्रार आणि पालिकेने पाल यांच्या बांधकामाला तोडण्याची नोटीस रद्द करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागण्यात आली. लाच मागणाऱ्या विरोधात लाच लुचपत विभागात तक्रार केल्यावर १० हजार रुपयांचा पहिला हफ्ता घेताना कनिष्ठ अभियंता योगेश पंडित व तक्रारदार दलाल रामसुरत यादव यांना २५ जुलै २०१५ रोजी अटक केली आहे. 

भांडुपच्या एस विभागाकडून राहत असलेली जागा सोडून जाण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून धमकावले जात असल्याची तक्रार पाल यांनी पालिका आयुक्त,मुख्यमंत्री, पोलिस आयुक्त, एस विभागयांच्याकडे केली आहे. पाल यासंदर्भात पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट मिळवायचा प्रयत्न करत होते परंतू आयुक्तांची भेट मिळत नसल्याने न्याय मिळण्यासाठी पाल यांनी २६ ऑक्टोबर पासून मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरु केले आहे.पाल यांनी उपोषण सुरु करून तीन दिवस झाले तरी पालिका आयुक्त आणि पालिका अधिकारी या उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहेत. याच वेळी पाल यांना तुमचे घर आम्ही बांधून देतो पण आमच्या अभियंत्याला पकडून दिले ती केस परत घ्या म्हणून एस विभागातील अधिकाऱ्यांकडून पाल यांच्यावर दबाव टकला जात आहे अशी माहिती पाल यांनी आली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS