सेना-काँग्रेसच्या शिववडा अन् कांदे पोह्यांनंतर सपाची मुंबईत 'फूड ट्रक' योजना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 October 2015

सेना-काँग्रेसच्या शिववडा अन् कांदे पोह्यांनंतर सपाची मुंबईत 'फूड ट्रक' योजना

मुंबई - शिवसेनेच्या शिववडा-पावाला महापालिकेची परवानगी मिळूनही त्याची विक्री सुरू झालेली नाही. त्यातच आता समाजवादी पक्षाने "फूड ट्रक‘चा पर्याय समोर आणला आहे. पक्षाने हा प्रस्ताव महापालिकेला दिला आहे. या फूड ट्रकमध्ये फक्त वडापाव, मिसळपाव, कांदापोहे अशा मराठी खाद्यपदार्थांसह देशभरातीलच नव्हे, तर जगभरातील खाद्यपदार्थ कष्टकऱ्यांना माफक दरात मिळणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी समाजवादी पक्षाने महापालिका आयुक्तांना दिला आहे. 

शिवसेनेने पाच वर्षांपूर्वी शिववडा-पावाचा प्रस्ताव महापालिकेत मंजूर करून घेतला आहे. त्यासाठी प्रभाग कार्यालयांतून अर्जही मागवण्यात आले. त्यापाठोपाठ कॉंग्रेसनेही महाराष्ट्र कांदेपोहे स्टॉल्सना मंजुरी मिळवली; पण या योजना आजवर प्रत्यक्षात आल्या नाहीत. उलट शिवसेनेने सुरू केलेले शिववडा-पावचे स्टॉल बेकायदा ठरवून पालिकेने ते हटवले.
समाजवादी पक्षाच्या युवक संघटनेचे मुंबई अध्यक्ष फरहान आझमी यांनी शुक्रवारी पालिकेतील गटनेते रईस शेख यांच्यासोबत आयुक्त अजोय मेहता यांना हा प्रस्ताव सादर केला. आयुक्त या प्रस्तावावर लवकरच निर्णय घेतील, अशी अपेक्षा आझमी यांनी व्यक्त केली. ट्रक आणि मोटरसायकलींवरही हे खाद्यपदार्थ विकण्याची ही योजना आहे.
‘फूड ट्रक‘मध्ये वडापाव, मिसळ किंवा उसळ पाव, कांदेपोहे असे पदार्थ तर असतीलच, पण त्याचबरोबर राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध खाद्यपदार्थही असतील. परदेशांतील पदार्थही माफक दरात विकले जातील, असे आझमी यांनी सांगितले. 15 ते 30 रुपयांत परदेशातील खाद्यपदार्थ मिळतील, अशी माहिती त्यांनी दिली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS