आयुक्तांविरुद्ध शिवसेनेचा एल्गार
मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणधिकारी शांभवी जोगी यांची पदानवती करून त्यांना उपशिक्षण अधिकारी पदावर आणण्याच्या आयुक्तांनी घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे मत सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव व्यक्त करीत जोगी यांच्या पाठीशी शिवसेना भक्कमपणे उभी राहील असे तृष्णा विश्वासराव यांनी सांगितले. यावरून पालिका आयुक्त विरुद्ध शिवसेना असा सामना पालिका रंगणार आहे.
शांभवी जोगी यांच्यावरील कारवाई बाबतचा निर्णय हा सभागृहातच झाला पाहिजे. आयुक्तांनी परस्पर कोणाच्या सांगण्यावरून आणि शुल्लक कारणावरून त्यांची पदनवती करणे चुकीचे आहे. जोगी यांचा प्रस्ताव सभागृहात तातडीचे कामकाज म्हणून आले असताना अशाप्रकारे आयुक्तांनी निर्णय घेणे योग्य नाही. त्यामुळे काढलेले सदर परिपत्रकच चुकीचे आहे. या संदर्भात आयुक्तांबरोबर महापौर दालनात भेट घेतली जाणार होती परंतु अचानक आयुक्तांना मंत्रालयातून बोलावणे आल्याने त्यांची भेट होवू शकली नाही.मंगळवारी आम्ही या संदर्भात आयुक्तांशी चर्चा करू असे सभागृह नेत्या विश्वासराव यांनी सांगितले.
आयुक्त सदर प्रकरणी सभागृहात प्रस्ताव आणतील त्यावेळी शिवसेना जो काय निर्णय घ्याचा तो घेईल असा सूचक इशारा विश्वासराव यांनी यावेळी दिला. सभागृहात ज्याप्रमाणे पर्युषण पर्वातील कत्तलखाने बंद करण्याबाबतचा निर्णय रद्द झाला. त्याच पद्धतीने सभागृहात आयुक्तांबरोबर भाजपलाही आपली जागा दाखवून देण्याचा प्रयत्न शिवसेनकडून होण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment