थकित मानधनासाठी अंगणवाडी सेविकांचे घंटानाद आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 October 2015

थकित मानधनासाठी अंगणवाडी सेविकांचे घंटानाद आंदोलन

मुंबई / प्रतिनिधी 
एकात्मिक बालविकास सेवा योजनेत राज्यात ९५ हजार ३४१ सेविका व ९२ हजार २३ मदतनीस तसेच ९ हजार ८९८ मिनी सेविका अश्या एकूण २ लाख अंगणवाडी महिला कर्मचारी काम करीत आहेत. या अंगणवाडी सेविकांना ५ हजार रुपये मदतनीस व मिनी सेविकांना २ हजार ५०० रुपये मासिक मानधन शासनाकडून दिले जाते. या सेविकांना तुटपुंजे मानधन दिले जात असले तरी हे मानधन कधीही वेळेवर दिले जात नाही. आजही या सेविकांना ऑगस्ट महिन्यापासून मानधनाची रक्कम दिली गेलेली नाही. हे थकित मानधन  व भाऊभीजेचि रक्कम दिवाळीपूर्वी देण्यात यावे यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने एम. ए. पाटील, बृजपाल सिंग, मंगला सराफ यांच्या उपस्थित हजारो अंगणवाडी सेविकांनी घंटानाद आंदोलन केले.

देशातील तेलंगणामध्ये अंगणवाडी सेविकांना ७२०० रुपये, हरियाणामध्ये ७००० रुपये, केरळमध्ये १० हजार रुपये मानधन देण्यात येते. याच धर्तीवर पुरोगामी महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ मिळाली पाहिजे. खासदार समितीचा अहवाल मंजूर करून कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, अंगणवाडी सेविकांना आणि मदतनिसाना तृतीय आणि चतुर्थ वेतनश्रेणी लागू करून इतर भत्ते आणि सेवेचे फायदे द्यावेत, आजारपणाची भरपगारी राजा देण्यात यावी. मानधन देण्यासाठी उणे तरतुदीत बिडीएसची सुविधा सुरु करावी. अश्या विविध १९ मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस बृजपाल सिंग यांनी दिली. याच वेळी थकित मानधन वेळेत न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS