मुंबई / अजेयकुमार जाधव
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बौद्धजन पंचायत समितीच्या दादर भोईवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह आहे. या स्मारक सभागृहाचे नवीनीकरण येणार आहे. त्यासाठी आरक्षणात बदल करावे लागणार होते त्यासाठी मुंबई महानगर पालिकेच्या सुधार समितीची आवश्यकता होती. स्मारक सभागृहाचे आरक्षण बदलावे म्हणून शिवसेनेची एक नगरसेविका विरोध करत होती. यानंतर सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी आणि सदस्यांनी बौद्धजन पंचायत समितीच्या स्मारक सभागृहाला भेट दिली असता लवकरच सुधार समितीच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेवू असे आश्वासन प्रकाश गंगाधरे यांनी दिले होते. प्रकाश गंगाधरे यांनी दिलेल्या आश्वासना प्रमाणे गुरुवारी झालेल्या बैठकीत स्मारक सभागृहासाठी लागणाऱ्या आरक्षणात आवश्यक असणारे बदल करण्यास मंजुरी दिली आहे.
मुंबई महानगर पालिकेने दादर भोईवाडा येथे जेरबाई वाडिया मार्ग येथे 1956 मधे 40 बाय 70 चौ.मी.जागा बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहासाठी देण्यात आली होती. 1974 मधे पालिकेने बौद्धजन पंचायत समितीला 1000 चौ.मी. इतका भूखंड संस्थेला कराराने देण्यात आला आहे. या भूखंडावर बौद्धजन पंचायत समितीचे मुख्य कार्यालय व स्मारक हॉल ५० ते ६० वर्षाहून अधिक काळा पासून आहे. याच भूखंडावर अतिक्रमण झालेल्या झोपड्या असल्याने 1995 नंतर एसआरए प्रोजेक्ट राबव्न्यात आल्याने संस्थेकड़े फ़क्त 495 चौ.मी. इतकाच भूखंड बाकी राहिला होता. या बाकी जागे पैकी140.12 चौ. मी. भूखंड बेघरांच्या आरक्षित करावा अशी मागणी करत उरलेल्या 350 चौ. मी. जागेवर स्मारक सभागृह बांधावे असा बदल करण्याची मागणी केली जात होती. परंतू जो काही उरलेला भूखंड आहे तो तरी स्मारक सभागृहाला मिळावा अशी मागणी पंचायत समिती आणि आंबेडकरी जनतेकडून केली जात होती.
पंचायत समिती आणि आंबेडकरी जनतेच्या मागणीला शिवसेनेच्या एका नगरसेविकेने गेले ६ महिने विरोध केल्याने सहा महिन्यात हा प्रस्ताव मंजूर होऊ शाकेलेला नव्हता. शिवसेनेच्या नगरसेविकेचा विरोध असल्याने सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे आणि समितीचे सदस्य मोहन मीठबावकार, ज्योत्स्ना दीघे, माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी स्मारक सभागृहाला भेट दिली. या भेटी दरम्यान प्रकाश गंगाधरे यांनी पंचायत समितीला स्मारक सभागृह बांधण्यासाठी जो भूखंड लागणार आहे तो देण्यात येईल त्यासाठी लागणारे आरक्षण बदलण्यात येईल असे आश्वासन दिले होते. या भेटीवेळी पंचायत समितीचे आनंदराज आंबेडकर, आर. सी. तांबे, रमाकांत यादव, लक्ष्मण भगत, किशोर मोरे इत्यादी पदाधिकारी उपस्थीत होते. सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी दिलेल्या आश्वासना प्रमाणे गुरुवारी झालेल्या बैठकीत स्मारक सभागृहासाठी लागणाऱ्या आरक्षणात आवश्यक असणारे बदल करण्यास मंजुरी दिली आहे. सुधार समितीची मंजुरी मिळाल्याने आता लवकरच परेल भोईवाडा येथे बौद्धजन पंचायत समितीचे भव्यदिव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
No comments:
Post a Comment