मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगर पालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराला राज्य सरकारने २४ फेब्रुवारी २०१५ ला जाहीर केल्या प्रमाणे १३ हजार ७४० रुपये किमान वेतन मिळत नाही. या सफाई कंत्राटी कामगाराना किमान वेतनापेक्षा कमी पगार देण्यात येतो. नियमापेक्षा कमी पगार देवुन पालिका आयुक्त नियमांची पायमल्ली करत आहेत.पालिका आयुक्त आय आय.ए. एस. अधिकारी असले तरी भारतीय संविधानानुसार बनलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत आहेत. पालिका आयुक्तांनी कायदे धाब्यावर बसवल्याने मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारामध्ये या कंत्राटी कामगारांची घरे चालवणे कठीण झाल्याने मुंबई महानगर पालिका मुख्यालयावर मोर्चा आणण्यात आला.
यावेळी कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सहा हजार कर्मचाऱ्यांना नियमानुसार पगार मिळत नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणण्यात आले. प्रत्तेक कंत्राटी कर्मचाऱ्याला किमान वेतनाची थकबाकी म्हणून ३७ हजार ५३६ रुपये, सन २०१४-१५ चा बोनस म्हणून ८५०० रुपये, नोव्हेंबर महिन्याचा मिळणारा पगार म्हणून १३, ७४० रुपये, आणि भविष्य निर्वाह निधीचे पालिकेने न भरलेले १लाख १७ हजार ३०० रुपये असे एकूण २ लाख २३ हजार १११ रुपये थकबाकी मिळावी अश्या मागणीची पत्र कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.
No comments:
Post a Comment