मुंबई / प्रतिनिधी - महाराष्ट्र आरोग्य सेवेतील गट-ब संवर्गातील 15 अस्थायी बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचे गट-अ संवर्गात समावेशन करुन त्यांना कायमस्वरुपी शासन सेवेत सामावून घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार 2 फेब्रुवारी 2009 मधील अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या 15 वैद्यकीय अधिकाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याअगोदर महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवेतील गट-अ संवर्गातील अस्थायी स्वरुपात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे समावेशन करण्यात आले होते. याच धर्तीवर गट-ब मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बाबत निर्णय घेण्यात आला आहे.
Post Top Ad
29 October 2015
Home
Unlabelled
अस्थायी बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा निर्णय
अस्थायी बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा निर्णय
Subscribe to:
Post Comments (Atom)
JPN NEWS
'जेपीएन न्यूज' हे २०१२ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांच्या समस्या, ताज्या घडामोडी, राजकारण, मंत्रालय, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बातम्यांना प्रसिद्धी दिली जाते.
No comments:
Post a Comment