मुंबई, दि.२७ ( विशेष प्रतिनिधी ) - अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे २४ वे अधिवेशन यंदा दिनांक २७ व २८ नोव्हेंबर रोजी येथील शंकर नारायण महाविद्यालयात संपन्न होत आहे. या निमित्ताने होत असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील संमेलनाला राज्याभारातून तसेच देशभरातून प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे ह्यांच्या हस्ते उद्घाटन होत असलेल्या या परिषदेला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . संजय देशमुख, पुणे डेक्कन अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . वसंत शिंदे, जेष्ठ इतिहास संशोधक डॉ . जयसिंगराव पवार आणि अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉ. सदाशिव शिवदे आदी मंडळी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय राज्यभरातून इतिहासाचे प्राध्यापक, शिक्षक, अभ्यासक आणि विद्वान मंडळी या निमित्ताने भाईंदर नगरीत येणार आहेत.
अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद हि २५ हून अधिक वर्ष इतिहास प्रेमी, अभ्यासक, संशोधकांना एकत्र आणणारी संस्था आहे. इतिहास संशोधनाला चालना मिळावी तसेच इतिहास लेखनाचे काम निरंतर चालत राहावे, योग्य इतिहास लिहिला जावा, अशा अनेक उद्देशाने संस्थेची वार्षिक अधिवेशने महाराष्ट्र भर झाली आहेत. मान्यवर इतिहासकारां बरोबर अनेक इतिहासाचे शिक्षक आणि संशोधक संस्थेचे आजीव सभासद आहेत. या आधिवेशन मुळे नामवंत इतिहासकार आणि विद्वानांची मांदियाळी या नगरात तसेच महाविद्यालयात अवतरणार आहे. शंकर नारायण एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष तसेच मिरा भाईंदर मनपा चे सभागृह नेते रोहिदास पाटील, संस्थेचे सचिव तसेच मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य महेश म्हात्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू यादव, इतिहास विभाग प्रमुख प्रा. सुनील धापसे, डॉ सुरेख मिश्रा, प्रा. निमेश पाटील, विद्यार्थी प्रमुख शाहरुख मुलाणी यांनी आयोजन समिती तसेच सर्व एस. एन. परिवार या निमित्ताने येणाऱ्या सर्व अध्यासाकांच्या स्वागत साठी उत्सुक आहे असे स्वागताध्यक्ष रोहिदास पाटील यांनी म्हंटले.
मिरा भाईंदर परिसर सध्या ज्या प्रमाणे भारताची आर्थिक राजधानी मुंबई ला लागून आहे, तसा तो नेहमीच या भागातील आर्थिक केंद्र शी जोडलेला होता. प्राचीन काळी सोपारा तसेच मध्ययुगीन कालखंडात वसई, मुंबई, ठाणे, कल्याण, आदींच्या सानिध्यामुळे या शहराला सुध्दा प्राचीन काळा पासून चा ऐतिहासिक वारसा आहे. घोडबंदर किल्ला आणि धारावी चा चौकी वजा छोटा किल्ला अशा इतिहासाच्या खुणा आजही स्पष्ट पणे दिसतात. मात्र काळाच्या ओघात इतर ठिकाण प्रमाणे इथे सुद्धा या खुणा पुसल्या जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. वाढत्या शहरी करणामुळे हा धोका भाईंदर सारख्या शहरात जास्तच प्रखरपणे जाणवत आहे. ऎतिहासिक वारस्यांचे जतन, संवर्धन आदी साठी इतिहास प्रेमी आणि अध्यासाकांचे प्रयत्न चालू आहेत. या संमेलनाच्या माध्यमातून अशा प्रयत्नांना बळ मिळणार आहे. इतिहास हा आता फक्त भूतकाळाचा विषय न राहता उपयोजित विषय बनला आहे. सर्व सामन्यात या बाबत ची जागृती करून इतिहासाला लोकप्रिय बनविणे हा सुद्धा या समेलानाचा हेतू असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. सुनील धापसे यांनी केले.
या परिषदेत अभ्यासक प्राचीन, मध्ययुगीन, तसेच आधुनिक अशा तिन्ही विभागात आपले शोधनिबंध सादर करू शकतील. तिन्ही विभागांसाठी अनुक्रमे रवींद्र लाड- मुंबई, गोपाळराव देशमुख- पंढरपूर, डॉ. अवनीश देशमुख- कोल्हापूर या मान्यवर संशोधकांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. समारोपाच्या दिवशी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संशोधकांचा गौरव केला जाणार आहे. स्थानिक कला व संस्कृतीचा परिचय पाहुण्यांना करून देण्या साठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक कलाकारान मार्फत करण्यात आले आहे. परिसरातील सर्व इतिहास प्रेमींनी भाईंदर परिसरात प्रथमच होणार्या या संमेलनाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

No comments:
Post a Comment