मुंबईमध्ये गॅस गळती आणि गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी दोन ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे मुंबई महानगर पालिकेचा बेफिकीर कारभार समोर आला आहे. १६ ऑक्टोबरला कुर्ला पश्चिम येथील ‘सिटी किनारा’ या हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ७ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
कुर्ला येथील किनारा या हॉटेलला लागलेल्या आगी मुळे ८ लोकांचा मृत्यू झाला होता. ८ लोकांच्या मृत्यू नंतरही पालिकेला जाग आली नव्हती. परंतु या घटनेत विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यावर खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांना कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालिकेला आपल्या कर्तव्याची आठवण झाली आहे. दर दिवशी शासकीय सुट्टी सोडून अनधिकृत आणि नियम न पाळणाऱ्या उपहारगृह आणि हॉटेलवर कारवाई सुरु केली आहे. दर दिवशी पालिकेच्या प्रत्तेक विभागात १० हॉटेलला भेटी देवून कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी देताच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे.
दर दिवशी पालिकेच्या २४ विभागात प्रत्तेकी १० प्रमाणे २०० हून अधिक उपहार गृहाना भेटी देवून नियम डावलून चालवल्या जाणाऱ्या ९ ते १० उपहार गृहावर कारवाई करत अश्या उपहार गृहाना सिल लावून बंद केली जात आहेत. हि कारवाई करताना मोठी हॉटेल बाजूला राहत आहेत. जास्तीत जास्त कारवाई हि लहान हॉटेलवर होत आहे.
किनारा हॉटेल हे छोटे हॉटेल असल्याने पालिका अधिकाऱ्यांनी मोठ्या हॉटेलवर कारवाई करण्याचे टाळून लहान हॉटेलवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आयुक्तांच्या आदेशानंतर पालिका अधिकाऱ्यांच्या अंगात संचारल्याप्रमाणे कारवाई सुरु आहे. अश्याच एका कारवाई दरम्यान एका मुकादमाला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून मारही खावा लागला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशा नंतर पालिकेला जाग आल्यावर पालिका जी कारवाई करत आहे त्यामध्ये मोठी हॉटेल सुटत आहेत. ती का सोडली जात आहेत. कोणाच्या आदेशाने त्यावर कारवाई केली जात नाही याची चौकशी करण्याची गरज आहे. पालिका आयुक्त अशी चौकशी करतील का असा मुंबईकर नागरिकांचा प्रश्न आहे.
मोठ्या हॉटेलवर कारवाई का नाही याची चौकशी तर हवीच त्याच बरोबर सध्या जी कारवाई करून हॉटेल उपहार गृहे सील करून बंद केली जात आहेत. दर दिवशी पालिका आयुक्तांच्या आदेशाने हॉटेल वर केलेल्या कारवाईची आकडेवारी मिडीयाला देवून पालिका आयुक्त आपली पाठ थोपटून घेत आहेत.
पालिका आयुक्त आपली पाठ थोपटून घेत असले तरी ज्या बेकायदेशीर आणि नियम धाब्यावर बसवून चालणाऱ्या हॉटेल्स वर कारवाई केली जात आहे हि हॉटेल्स बेकायदेशीररित्या कोणाच्या आदेशाने आणि आशीर्वादाने सुरु होती त्या पालिका अधिकाऱ्यांवर मात्र कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे दिसत आहे. यामुळे मुंबईकर नागरिक विविध प्रश्न उपस्थित करत आहेत.
पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी हॉटेलवर कारवाई करताना आपली पाठ थोपटून घेतली आहे. अधिकाऱ्यानीही अश्या हॉटेलवाल्यांकडून हफ्ते घेवून आपली घरे भरली आहेत. आता त्यांच्यावरच आयुक्तांचे आदेश असल्याचे सांगत कारवाई करत आहेत. आधी ज्यांच्याकडून हफ्त्याचे पैसे खा खा खाल्ले आता त्यांच्यावरच कारवाई केली जात आहे.
पालिका अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने नियम धाब्यावर बसवून मुंबईत अशी हॉटेल चालू होती. पालिका अधिकाऱ्यांनी हि हॉटेल वेळीच कारवाई करून बंद केली असती तर किनारा हॉटेल मधील मृत्यूमुखी पडलेल्या ८ मुलांचे / लोकांचे प्राण वाचवता आले असते. या ८ लोकांच्या मृत्युला पालिका अधिकारीही हॉटेल मालकांप्रमाणेच दोषी आहेत. अश्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास पालिका टाळाटाळ करत आहे.
पालिका आयुक्त अजोय मेहता जितक्या हॉटेलवर कारवाई करत आहेत ती सर्व हॉटेल्स पैका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अद्याप सुरु होती. आयुक्तांनी आणि पालिका अधिकाऱ्यांनी वेळीच अश्या हॉटेल्सवर कारवाई केली असती तर किनारा हॉटेलमधील दुर्घटना टाळता आली असती आणि ८ लोकांचे जीव वाचवता आले असते. या दुर्घटनेत ८ लोकांचा जीव गेला आहे. त्याबाबत पालिका अधिकाऱ्यानाही शिक्षा व्हायलाच हवी.
मुंबईमध्ये सुरु असलेल्या कारवाईमधून मोठ्या प्रमाणात नियमबाह्य हॉटेल्स सूरु असल्याची आकडेवारी पालिकाच देत आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी हि आकडेवारी बघून स्वताची पाठ थोपटून घेण्याबरोबरच ज्या अधिकाऱ्यांमुळे हि हि हॉटेल्स सुरु होती. आणि किनारा सारखी दुर्घटना घडली अश्या सर्व पालिका अधिकाऱ्यांनाही दोषी ठरवून फौजदारी कारवाई करायला हवी. तरच किनारा दुर्घटनेत बळी पडलेल्या ८ लोकांना खरा न्याय मिळू शकेल याची नोंद आयुक्तांनी घ्यायला हवी.
अजेयकुमार जाधव
(मो. ९९६९१९१३६३)
No comments:
Post a Comment