सामान्य जनते ऐवजी उद्योगपतींनाच चांगले दिवस आले
मुंबई / प्रतिनिधी
भारतातील लोकांना अच्छे दिन येतील असे आश्वासन देवून भाजपा सत्तेवर आली. महागाई प्रचंड वाढत आहे परंतू सामान्य जनते ऐवजी रिलायंस टाटा अदानी सारख्या उद्योगपतींनाच चांगले दिवस आले आहेत असा टोला भारतीय जनहित काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा शबाना पांडियन यांनी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत लगावला आहे.
खोट बोलून सत्तेवर आल्यावर भाजपाने उद्योगपतींना फायदा पोहचवायला सुरुवात केली आहे. संपत्ती कर, वीज, पाणी बिल वाढल्याने सामान्य जनता त्रस्त आहे. महागाई प्रचंड वाढत असताना सरकार महागाई कमी करण्यात अपयशी ठरले आहे. सरकार महागाई कमी करून सामान्य जनतेला न्याय देण्यास कमी पडत असल्याने सरकारचा आम्ही निषेध करतो असे शबाना पांडियन यांनी सांगितले.
दिल्ली सरकारने आपल्या राज्यातील नागरिकांवर वीज बिलाचा भार पडू नये म्हणून विज युनिटच्या दरात सुत दिली आहे. अशीच सुट महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातल्या नागरिकाना द्यावी अशी मागणी शबाना यांनी केली. सरकारने वाढती महागाई, वीज, पाणी बिलामध्ये झालेली वाढ त्वरित कमी न केल्यास येत्या काही दिवसात भारतीय जनहित काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रीय भीम सेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा शबाना पांडियन यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment