मलनिःसारण प्रकल्प चार वर्षे रखडले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 October 2015

मलनिःसारण प्रकल्प चार वर्षे रखडले

कॅगचे ताशेरे, चौकशीची शिवसेनेची मागणी
मुंबई ( प्रतिनिधी ) - मलनिःसारण प्रकल्पासाठी पालिकेने अर्थसंकल्पात 140 कोटी रुपये रुपयांची तरतूद केली. त्यासाठी सल्लागार नेमले. मात्र गेली चार वर्षांपासून प्रकल्पांची कामेच झालेली नाहीत असे ताशेरे कॅगने ओढले आहेत निधीची तरतूद करूनही कामे न झाल्यामुळे या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.


गेल्या 2008 साली मलनिःसारण प्रकल्पासाठी पालिकेने परवानगी दिली होती. या प्रकल्पांसाठी सल्लागारही नेमले होते. केंद्र सरकारच्या परवानग्या मिळाल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सातत्याने सांगितले. मात्र एकही परवानगी प्रशासनाने मिळविली नसल्याने प्रकल्प रखडविल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिली. निविदा प्रक्रिया सुरू असल्याची खोटी माहिती सातत्याने प्रशासनान दिली. मात्र प्रकल्पांचे काम प्रत्यक्ष झाले नाही असेही त्यांनी सांगितले पालिकेतील सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्याचे हे षढयंत्र असून कॅगने मारलेले ताशेरे यात सत्य आहे. या प्रकरणाची चौकशी करून प्रकल्प रखडविणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांविरूध्द कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad