मुंबई / प्रतिनिधी - मुंबईत तुरडाळीच्या किंमती अजूनही २०० च्यावर, सरकार किंमती कमी झाल्याचा दिखावा करतेय, सरकार फक्त घोषणाबाजी करतेय... ऐन सणासुदीच्या दिवसात जीवनाश्यक वस्तूंच्या महागाईने सामान्य जनता त्रस्त झालेली आहे, याकरिता येणाऱ्या सोमवार दि. २६ ऑक्टोबर, २०१५ व मंगळवार दि. २७ ऑक्टोबर, २०१५ तारखेलामुंबईतील सर्व रेल्व स्थानकाबाहेर मुंबई काँग्रेस तर्फे महागाई विरोधात आंदोलन करण्यात येणार, असे मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.
डाळीच्या किंमती कमी झाल्याचा सरकारचा दावा खोटा, आज आम्ही मुंबईच्या विविध भागात तुरडाळ खरेदी केली, तूरडाळीचे भाव २०० रुपयांच्या वर आहेत. भाजपने जे वातावरण देशभरात तयार केलंय त्याच प्रतिबिंब काल शिवसेनेच्या दसरामेळाव्यातून दिसलं, शिवसेना भाजपवर टीका करतेय मात्र सत्तेतून बाहेर पडत नाही आणि भाजपही त्यांना बाहेर काढत नाही, हे दोन्ही पक्ष ढोंगी... लोकांनी सरकार चालवण्यासाठी त्यांना निवडूण दिलंय भांडण्यासाठी नाही, भांडायच असेल तर सत्ता सोडा आणि भांडा, असे निरुपम म्हणाले.
गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारने टाकलेल्या धाडीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुर व अन्य डाळींचा साठा सापडत असून राजकीय धागेदोरे आणि शासकीय यंत्रणेतील वरिष्ठांचे आशीर्वाद असल्यानेच राज्य सरकार इतके दिवस सर्वसामान्य जनतेची लुट करत होती, असा आरोप निरुपम यांनी केला. केंद्रीय मंत्री व्ही के सिंग यांच्या वक्तव्यान दलितांचा अपमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा त्यांच्या वक्तव्याला पंतप्रधानांची सहमती आहे, असे आम्ही समजू, असे निरुपम म्हणाले. उत्तर भारतीयबाबात केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजूजू यांच्या वक्तव्याचा निषेध करत
पंतप्रधानांनी व्ही के सिंग आणि किरण रिजूजू यांनी राजीनामे घ्यावेत, अशी मागणी निरुपम यांनी केली.
No comments:
Post a Comment