विकास आराखड्यात 4 टप्यात सुधारणा करू - पालिका आयुक्त
मुंबई / प्रतिनिधी
मुंबई शहरासाठी सन 2014 ते 2034 या 20 वर्षासाठी बनवण्यात येणार्या विकास आराखड्यात 4 टप्यात सुधारणा करून 16 फेब्रुवारी नंतर आराखडयावर सुचना व हरकती मगवाल्या जातील अशी माहिती पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिली.
या आराखड्यात स्थळांच्या नोंदी, रस्ते , डीसीआर, आणि आरक्षण यामधे झालेल्या चुका सुधारल्या जाणार आहेत. 8347 स्थळांच्या नोंदीमधे चुका होत्या. त्यापैकी वार्ड अधिकार्याकडून 1700 चुका दुरुस्त करून घेण्यात आल्या आहेत. 500 स्थळांच्या नोंदी गायब होत्या त्यांची नोंद घेण्यात आली. स्थळांच्या नोंदीमधे सुधार करून त्याची माहिती सीडी मधे गट नेत्याना देण्यात आली. यावेळी महापौर स्नेहल आंबेकर यांनी केलेल्या सुचनेनुसार ही माहिती संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे अशी माहिती अजोय मेहता यांनी दिली. स्थळांच्या सुधारणाबाबतची माहिती संकेतस्थळावर टाकल्यावर नागरिक, पत्र, ईमेल याद्वारे किंवा नगरसेवकांच्या माध्यमातून पालिकेला कळवू शकतात. परंतू या सूचना व् हरकती नसतील असे मेहता यांनी स्पष्ट केले आहे. रस्त्यांबाबत केलेल्या सुधारणासहीत आराखडा येत्या 15 दिवसात संकेतस्थळावर टाकला जाईल असे मेहता यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment