72 टक्के मुले पालकांपासून ऑनलाईन ऍक्‍टिव्हिटी लपवतात - JPN NEWS

राजकारण

test banner

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

28 October 2015

72 टक्के मुले पालकांपासून ऑनलाईन ऍक्‍टिव्हिटी लपवतात

48 टक्के मुले ब्राऊझर हिस्ट्री आणि 41 टक्के मेसेज डिलिट करतात.
मुंबई - प्रतिनिधी 

फेसबुक अकाऊंट उघडायला 13 वर्षे वयाची मर्यादा असली तरी मुले 8 ते 10 वर्षांची झाल्यावरच फेसबुकवर अकाऊंट उघडतात. यापैकी मुंबईतील 85 टक्के मुलांना आपल्या वैयक्तिक माहितीची प्रायव्हसी जपायची असते. मुंबईतील 72 टक्के मुले आपल्या ऑनलाईन ऍक्‍टिव्हिटी पालकांपासून लपवून ठेवतात. 48 टक्के मुले ब्राऊझर हिस्ट्री डिलिट करतात आणि 41 टक्के त्यांचे मेसेज डिलिट करतात. 

इंटेल सिक्‍युरिटी कंपनीने प्रसिद्ध केलेल्या "टिन्स, ट्‌विन्स अँड टेक्‍नॉलॉजी‘ या सर्वेक्षणाच्या 2015च्या आवृत्तीतील वरील निष्कर्ष आहेत. आई-वडील किंवा शिक्षक आपल्या पोस्ट पाहतील या भीतीने 46 टक्के मुले टोपण नावाने अकाऊंट उघडतात. भारतातील 8 ते 16 वर्षे वयोगटातील मुला-मुलींचे ऑनलाईन बिहेविअर आणि सोशल नेटवर्किंगच्या सवयी जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येते. देशातील 2370 मुलांना आणि पालकांना प्रश्‍न विचारण्यात आले होते. यापैकी 1185 पालक, तर 1185 मुले होती.

देशात 8 ते 16 वयोगटातील 81 टक्के मुले-मुली सोशल मीडियावर ऍक्‍टिव्ह आहेत. सोशल नेटवर्कवर कधी ना कधी वाईट अनुभव आल्याचे प्रमाण देशात 43 टक्के, तर मुंबईत 47 टक्के आहे. देशात 52 टक्के, तर मुंबईत 57 टक्के मुलांनी अश्‍लील फोटो टॅग करून किंवा काही कमेंट करून इतरांना त्रास दिल्याचे मान्य केले. 59 टक्के मुलांनी कोणा ना कोणाला ब्लॉक केले आहे.

ट्‌विटर मुलांमध्ये तितके लोकप्रिय नाही. फेसबुकवर आणि त्याखालोखाल व्हॉट्‌सऍपवर मुले ऍक्‍टिव्ह आहेत. फेसबुकवर अकाऊंट उघडण्याची वयोमर्यादा 13 वर्षे असली, तरी मुले आठ ते 10 वर्षांची झाल्यावरच अकाऊंट उघडतात, असे या सर्वेक्षणातील निष्कर्ष आहेत. ज्या व्यक्तीला आपण पहिल्यांदा ऑनलाईनच भेटलो आहोत, अशा व्यक्तीला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा 54 टक्के मुला-मुलींनी व्यक्त केली. काहींनी अशी भेट घेतलेलीही आहे, असेही या पाहणीतील निष्कर्ष आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages