मुंबई /अजेयकुमार जाधव
मुंबईमधे डेंग्यू रोगाने थैमान घातले आहे. मुंबईमधे डेंग्यूवर मात करण्यात पालिकेला अपयश आले असताना पालिकेने केलेल्या आणि पुढील कालात करणार असलेल्या जनजागृतीच्या जाहिरातीवर 66 लाख 41 हजार रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समिती समोर सादर करण्यात आला आहे.
मुंबईमधे गेल्या काही वर्षात पावसाल्या दरम्यान डेंग्यू या रोगाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. डेंग्यूचे पेशंट मोठ्या संखेने रुग्नालयात दाखल होत आहेत. यावर उपाय करण्यात पालिका अपयशी होत असल्याचे आरोप होत असताना पालिकेने बेस्ट बस, व्हाट्सअप या सोशल मिडियावर जाहिरात प्रसिद्ध केली आहे. लवकरच चित्रपटगृहातही अश्या जाहिराती प्रदर्शित केल्या जाणार आहेत.
बेस्टच्या 100 बसेसवर जुलै ऑगस्ट दरम्यान जाहिरात करण्यासाठी 11 लाख रुपये खर्च केले आहे. पुन्हा सप्टेंबर ऑक्टोबर मधे 100 बसेस वर जाहिरातीसाठी 11 लाख रुपये खर्च केले आहेत. तसेच व्हाट्सअप या सोशल मिडियावर प्रदर्शित करण्यासाठी फिल्म बनवली गेली आहे त्यावर 68 लाख रुपये खर्च केले गेले आहेत.
पालिका 104 सिनेमागृहात 7 दिवस युएफओ यंत्रनेद्वारे जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे त्यासाठी 4 लाख 56 ह़जार रुपये खर्च केले जाणार आहे. 5 वाहिन्यांवर जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे त्यासाठी 33 लाख रुपये खर्च केले जाणार आहे. डेंग्यूवर मात करण्यासाठी केलेल्या व् करण्यात येणार्या जाहिरातीसाठी 66 लाख 41हजार रुपयाच्या खर्चाला मंजूरी मिळावी तसेच निविदा मागवण्याची अट शिथिल करावी अश्या मागणीचे 4 प्रस्ताव स्थायी समिती समोर सादर करण्यात आले आहेत.