ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका; मतदार यादीवर 2 नोव्हेंबरपासून हरकती, सूचना स्वीकारणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 October 2015

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका; मतदार यादीवर 2 नोव्हेंबरपासून हरकती, सूचना स्वीकारणार

मुंबई : विविध जिल्ह्यांमधील जानेवारी ते जून 2016 या कालावधीत मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 2 ते 9 नोव्हेंबर 2015 या कालावधीत मतदार यादीविषयी हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी दिली.
सहारिया यांनी सांगितले की, विधानसभेचीच मतदार यादी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी वापरली जाते. त्यासाठी 8 ऑक्टोबर 2015 यादिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यावरून ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात येणारी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 2 नोव्हेंबर 2015 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर 9 नोव्हेंबर 2015 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. 21 नोव्हेंबर 2015 रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

Post Bottom Ad