मुंबई, दि. 28: विविध आठ जिल्ह्यामंधील 157 ग्रामपंचायतींसाठी आज प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 81 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.
सहारिया यांनी सांगितले की, राज्यभरातील एकूण 2 हजार 352 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा तीन टप्प्यातील कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 28 सप्टेंबर 2015 रोजी जाहीर केला होता. त्यातील आज मतदान होणाऱ्या 189 ग्रामपंचायतींचा समावेश होता; परंतु यातील काही ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्याने उर्वरित 157 ग्रामपंचायतींसाठी आज प्रत्यक्षात मतदान झाले. या सर्व ग्रामपंचायतींची उद्या (ता. 29) मतमोजणी होईल व निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील आचारसंहिता संपुष्टात येईल.
प्राथमिक अंदाजानुसार जिल्हानिहाय झालेले सरासरी मतदान (कंसात मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या):
रायगड (36)- 79,
रत्नागिरी (4)-67,
नंदूरबार (22)- 75,
अहमदनगर (9)83,
पुणे (44)-75,
बीड (21)83-,
अकोला (13)- 71
चंद्रपूर (8)-82.
एकूण सरासरी (157)- 81.
रायगड (36)- 79,
रत्नागिरी (4)-67,
नंदूरबार (22)- 75,
अहमदनगर (9)83,
पुणे (44)-75,
बीड (21)83-,
अकोला (13)- 71
चंद्रपूर (8)-82.
एकूण सरासरी (157)- 81.
No comments:
Post a Comment