राज्य शासकीय कर्मचा-यांना रु. 10 हजार सुधारीत सण अग्रिम अनुज्ञेय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 October 2015

राज्य शासकीय कर्मचा-यांना रु. 10 हजार सुधारीत सण अग्रिम अनुज्ञेय


वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्वपुर्ण निर्णय
मुंबई / प्रतिनिधी 
केंद्र शासनाने केंद्र शासकीय कर्मचा-यांना अनुज्ञेय केलेल्या सण अग्रीमाच्या धर्तीवर अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचा-यांनाही आता सुधारीत सण अग्रिम   रु 10000/- अनुज्ञेय करण्याचा निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. 


वित्त विभागाच्या शासन निर्णय दि. 18/10/2012 नुसार रु 4800 व त्यापेक्षा कमी ग्रेड पे असलेल्या राज्य शासकीय कर्मचा-यांना  रु 5000/- एवढा सण अग्रीम (Festival Advance) अनुज्ञेय करण्यात आला होता. त्यात वाढ करून आता सुधारीत सण अग्रीम रु. 10000/- अनुज्ञेय करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय वित्त विभागाने दि. 26 ऑक्टोबर, 2015 रोजी निर्गमित केला आहे. सदर सण अग्रिम दिवाळी, रमझान ईद, ख्रिसमस, पारसी नववर्ष, संवत्सरी, रोश-होशना, वैशाखी पौर्णिमा (भगवान बुध्द जयंती), स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या नऊ सणांसाठी अनुज्ञेय असेल. तसेच सदर सण अग्रिमाची वसुली 10 हप्त्यामध्ये करण्यात येईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad