मुंबईत विविध साथीच्या आजाराचे थैमान -गेल्या आठ दिवसात 2848 रुग्ण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 September 2015

मुंबईत विविध साथीच्या आजाराचे थैमान -गेल्या आठ दिवसात 2848 रुग्ण

मुंबई २ सप्टेंबर २०१५ ( प्रतिनिधी ) -  गेल्या अनेक दिवसा पासून मुंबईत पावसाची उघड झाप सुरू असल्याने विविध साथीच्या आजारांनी चांगलेच डोकं वर काढले आहे तापाने आणि गॅर-टोने  तर धुमाकूळ घातला आहे गेल्या आठ दिवसात तब्बल 2848 संशयीत रुग्ण आढळून आले आहेत पावसाने मुंबईत ऊन पाऊस असे वातावरण पुढे ठेवले तर हे विविध साथीचे आजार वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे हे साथीचे आजार रोखण्यासाठी साठी पालिकेचे धाबे चांगलेच दणाणले आहेत 


मुंबईत सुरू वातीला पावसाने चांगली हजेरी लावली मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने मुंबईत ताप , लेप्टो , मलेरिया , र-वाईन प-लु आदि आजाराने मोठ्या प्रमाणातथैमान घातले आहेत त्यामुळे मुंबईकर चांगलाच हैराण झाला आहे.  पालिका आरोग्य विभागाला अजून म्हणावे तसे  आजार रोखण्यास यश पालिकेला आलेले नाही पालिका आजार रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्‍न करित आहे पाऊस जर पडला नाही तर आजार आणखीन वाढण्याची शक्यता गेल्या आठ दिवसात म्हणजेच  24 ते 31 ऑगस्ट या कालावधीत 2848 संशयीत रुग्ण आढळून आले आहेत या मध्ये सवाॅत जास्त रुग्ण तापाचे असून त्या खालोखाल र-वाईन प-लु , गॅर-टो, मलेरिया रुग्णाचा समावेश आहे हे साथीचे आजार रोखण्यासाठी साठी पालिकेची चांगलीच दमछाक होत आहे
दिवसेंदिवस साथीचे आजार वाढत असल्याने मुंबईकरांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे पालिकेची रुग्णाल्ये रुग्णानी खचाखच भरली आहेत                
आजाराचे नाव             आढळलेले संशयीत रुग्ण
                      
ताप                                        2120
डेंग्यू                                           23
लेप्टो                                          15
मलेरिया                                    200
गॅर-टो                                       220
र-वाईन प-लु                               215
टायफाईड                                     30
हेपेटीटीस                                     25

Post Bottom Ad