बौद्धजन पंचायत समितीच्या सभागृह बांधण्याच्या मागणीला पालिकेचा सकारात्मक प्रतिसाद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 January 2015

बौद्धजन पंचायत समितीच्या सभागृह बांधण्याच्या मागणीला पालिकेचा सकारात्मक प्रतिसाद

नायगाव व भोईवाडा येथील पुनर्रचित विकास आराखड्यात बदल करून तेथे सार्वजनिक सभागृह बांधण्याच्या बौद्धजन पंचायत समितीच्या मागणीला महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार आरक्षित क्षेत्र वगळून या सभागृहासाठी आरक्षण ठेवण्याची प्रक्रिया पालिकेने आणि राज्य सरकारने पूर्ण केली आहे. 

नायगाव व भोईवाड्यातील जेरबाई वाडिया मार्गाजवळील महापालिका योजना क्र. ५७ मधील भूखंड क्रमांक ७५ मध्ये अंतर्भूत असलेली जमीन अंशत: 'बेघरांसाठी घरे' आणि सार्वजनिक सभागृहासाठीही अंशत: आरक्षित आहे. हा भूखंड एकूण ४९५ चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाचा आहे. त्यापैकी सुमारे १४0.१२ चौरस मीटर क्षेत्र हे 'बेघरांसाठी घरे' यासाठी आरक्षित आहे, असे समितीचे वास्तुविशारद नंदकुमार उदास यांनी प्रमाणित केले आहे. या भूखंडावरील संपूर्ण बांधकाम 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती'ला देण्याची मागणी बौद्धजन पंचायत समितीने केल्यानंतर राज्य सरकारने व पालिकेने हालचाली सुरू केल्या आणि यासाठी असलेल्या मंजूर विकास आराखड्यात फेरबदल केले आहेत, असे राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने ५ फेब्रुवारी २0१४ रोजी पालिकेला कळवले आहे. यामुळे महापालिकेच्या एफ दक्षिण विभागाच्या मंजूर पुनर्रचित विकास आराखड्यात बदल करून, त्यात 'पब्लिक हॉल'चे आरक्षण ठेवण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्तांनी सुधार समितीसमोर मंजुरीसाठी मांडला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS