महिलांसाठी मैदान आरक्षित ठेवण्याची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 January 2015

महिलांसाठी मैदान आरक्षित ठेवण्याची मागणी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रत्येक विभागात एक मैदान महिलांसाठी आरक्षित ठेवावे, अशी मागणी महिला लोक आयोगाच्या अध्यक्षा रचना अग्रवाल यांनी महापौर स्नेहल आंबेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

अग्रवाल यांनी शनिव्२ारी एका शिष्टमंडळासह महापौरांची भेट घेतली व त्यांना यासंबंधी निवेदन दिले. मुंबईत ५७ लाख ४१ हजार ६३२ इतकी महिलांची संख्या आहे. स्वत:चा संसार, नोकरी अशी तारेवरची कसरत करणार्‍या या महिलांना स्वत:चे आरोग्य, मानसिक संतुलन राखण्याबरोबरच क्रीडाविषयक छंद जोपासता यावेत, यासाठी प्रत्येक विभागात किमान एक मैदान महिलांसाठी आरक्षित असणे आवश्यक असणे ही काळाची गरज आहे. यामुळे महापालिकेच्या अखत्यारीतील जी मैदाने महिलांसाठी आरक्षित करण्यासाठी योग्य आहे तेथे महिलांसाठी खेळण्याकरिता सुविधा उपलब्ध कराव्यात, 'एफ' दक्षिण विभागातील पुरंदरे क्रीडाप्रेक्षागृह हे मध्यवर्ती असून, तेथे योगाभ्यास, बॅडमिंटन, व्यायाम, महिला क्रिकेट व कराटे आणि जॉगिंग ट्रॅक, महिला बॉक्सिंग आदी क्रीडा प्रकारांचा वापर करण्यात यावा, अशी मागणी अग्रवाल यांनी केली आहे.

Post Bottom Ad