अन्न आणि औषध भेसळीबरोबरच आता पिण्याच्या पाण्याचाही गोरखधंदा सुरू झाला आहे. त्यामुळे शुद्ध पाणी म्हणून 'मिनरल वॉटर'ची बाटली विकत घेणार्यांना 'सावधान' म्हणण्याची वेळ आली आहे. 'मिनरल वॉटर'च्या नावाखाली अशुद्ध पाणी पुरवणार्या वसई-विरारमधील कंपन्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) धाडसत्र सुरू केले आहे.
संबंधित कंपन्यांकडे 'ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड'(बीआयएस) तसेच 'एफडीए'चाही परवाना नव्हता. या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल केल्याची माहिती एफडीएचे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली. वसई-विरार परिसरातील विहिरी, नळाचे पाणी 'बाटलीबंद' करून विकले जात असल्याचे 'एफडीए'च्या कारवाईदरम्यान निदर्शनास आले. 'एफडीए'ने धाडसत्रादरम्यान मेसर्स श्रीनाथ एंटरप्रायझेस, विंध्यवासिनी एंटरप्रायझेस, मेरुघर वॉटर, शांतीजल, स्टार डिस्ट्रिब्युटर्स, प्युअर अँक्वा, मारिया एंटरप्रायझेस आणि श्री एंटरप्रायझेस आदी कंपन्यांवर गुन्हे दाखल केल्याचे समजते.