आरपीएफला प्रवाश्याबरोबर चांगले वागण्याचे प्रशिक्षण देणार - सुरेश प्रभू (रेल्वे मंत्री) - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 January 2015

आरपीएफला प्रवाश्याबरोबर चांगले वागण्याचे प्रशिक्षण देणार - सुरेश प्रभू (रेल्वे मंत्री)

मुंबई / अजेयकुमार जाधव  
प्रवाश्यांमधे असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. प्रवाश्यामधील असुरक्षेची भावना कमी व्हावी यासाठी सर्वत्र युनिफोर्म घातलेले पोलिस असायला हवेत. असुरक्षित वाटेल अश्या वेळी पोलिसांनी प्रवाश्यांना चांगल्या प्रकारे मदत करायला हवी. महिला प्रवाशी आणि इतर प्रवाशी याना मदत व्हावी म्हणून आरपीएफ पोलिसाना प्रशिक्षण दिले जाईल अशी माहिती केन्द्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यानी दिली. ते महिलांसाठी आरपीएफ पोलिसांद्वारे सुरु केलेल्या मोबाईल अप्लिकेशनच्या उदघाटना प्रसंगी बोलत होते. 
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट येथील मुख्यालयात आयोजीत कार्यक्रमात बोलताना परिवहन उपक्रम राबवनारया सर्व उपक्रमानी आपल्या प्रवाश्यांना सुरक्षित पोहचवने गरजेचे असते. परंतू सध्या रेल्वे प्रवासी व खास करुन महिला प्रवाश्यांमधे असुरक्षतेची भावना वाढत आहे. ही असुरक्षतेची भावना कमी करता यावी यासाठी प्रवाश्यांना सुरक्षा पुरावायला हवी यासाठी लवकरच पाऊले उचलली जातील असे प्रभू म्हणाले. 
आज भारतात ९० कोटी लोकांकडे मोबाईल आहेत. रेल्वे प्रवाश्यांकडे  मोठ्या प्रमाणात मोबाईल आहेत. मोबाइलचा वापर असुरक्षितपणा वाटेल अश्या वेळी करता येवू शकतो.म्हणून हे  चांगल्या मोबाईल अप्लिकेशन सुरु करण्यात आले. एमइंडीकेटरवर उपलब्ध असलेल्या अप्लिकेशनचा वापर करून आरपीएफ पोलिसांना आणि आपल्या नातेवाईकाना एकाच वेळी सन्देश पाठवता येवू शकतो असे प्रभू यानी सांगितले. सुरक्षा देणे ही राज्य सरकारचा विषय असल्याने, तसेच रेल्वे मधील आरपीएफ आणि जीआरपी पोलिस यांच्यामधे संतुलानाची गरज असून येत्या १५ जानेवारीला सर्व राज्यांच्या पोलिस प्रमुखांची बैठक घेतली जाणार आहे. 

Post Bottom Ad