मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महापालिकेने पार्किंग शुल्कात वाढ करणारा प्रस्ताव शुक्रवारी पालिका सभागृहात विरोधकांच्या विरोधाचा विचार न करता मंजूर केला. सत्ताधार्यानी या प्रोजेक्टला मंजूरी दिल्याने विरोधकानी सभात्याग केला. मुंबई मधील एका वार्ड मधे हा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवण्यात येणार असला तरी लवकरच मुंबईकराना आता तिप्पट पार्किंग शुल्क द्यावे लागणार आहे. संदर्भातील उप सुचना माजी महापौर सुनील प्रभू यांनी मांडली. याला मंजुरी मिळाल्याने विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी जोरदार विरोध करत पालिका सभागृहातून सभात्याग केला.
दक्षिण मुंबईत होणारी वाहनांची कोंडी तसेच सार्वजनिक वाहतुकीचा होणारा खोळंबा या समस्येवर मार्ग काढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या प्रस्तावात व्यावसायिक संकुले तसेच वाहनांची संख्या यावरून शहरातील परिसरांचे तीन भाग करण्यात आले आहेत. प्रत्येक परिसरानुसार वेगवेगळे पार्किंग शुल्क लावले जाणार आहे . सरकारी कार्यालये, व्यावसायिक संकुल, रेल्वे स्टेशन अशा भागात एका तासासाठी ६० रुपये दर आकारण्यात येणार आहे. पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या ९२ पे अॅण्ड पार्कपैकी ६२ ठिकाणी ६० रुपये प्रतितास, २४ ठिकाणी ४० रुपये प्रतितास आणि उर्वरित सहा ठिकाणी २० रुपये प्रतितास असा दर असेल. या पार्किंग लॉटच्या बाहेर ५०० मीटर परिसरात पार्किंग करण्यासाठी दुप्पट दर लावले जाणार आहेत.
नवीन पार्किंग दर शहर पूर्व पश्चिम गाडीचा प्रकार दिवसा रात्री दिवसा रात्री दिवसा रात्री
दुचाकी १६५० ८२५ ११०० ५५० ५५० २७५
खाजगी गाड्या ३९६० १९८० २६४० १३२० १३२० ६६०
ऑटो ट्याक्सी १९८० ९९० १३२० ६६० ६६० ३३०
ट्रक ९९०० ४९५० ६६०० ३३०० ३३०० १६५०
पब्लिक ट्रांसपोर्ट ६९३० ३४६५ ४६२० ३२१० २३१० ११५५