मुंबई (प्रतिनिधी) : मराठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा अनेक वर्षे लढवताना १०५ हुतात्म्यांना बलिदान द्यावे लागले. त्यानंतर १९६० मध्ये मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या लढ्याची माहिती पुढील पिढीला मिळावी तसेच त्यापासून त्यापासून त्यांनी प्रेरणा घ्यावी, या उद्देशाने पालिकेने उभारलेल्या महाराष्ट्र स्मृती दालनाचा समावेश महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या यादीत करावा, अशी मागणीला हिरवा कंदील मिळाला असून लवकरच स्मृती दालनाचा समावेश राज्य पर्यटन यादीत होणार आहे.
संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचा उद्घाटन सोहळा ३० एप्रिल २०१० रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाला होता. परंतु सदर दालन महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या यादीत समाविष्ट नसल्याने मुंबई बाहेरील राज्यांतून तसेच विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना हे दालन अनेक पर्यटक कंपन्यांकडून दाखवले जात नव्हते. त्यामुळे सदर दालनाच्या निर्मितीच्या मुख्य उद्दिष्टाला बाधा येत असल्याने नगरसेवक जाधव यांनी पालिकेच्या सभागृहात ठरावाची सुचना मांडली होती.