मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली स्थानकात पेन्टाग्राफ तुटल्याने नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी दिवा आणि डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाश्यांनी संताप व्यक्त करत उस्फुर्त आंदोलन केले. प्रवाश्यांच्या या आंदोलनामुळे रेल्वेचे प्रचंड नुकसान झाले असले तरी या नुकसानीला रेल्वेचे सुस्त बसलेले अधिकारीच जबाबदार आहेत. प्रवाश्यांना वेळेवर सुविधा मिळत नसल्याने वेळोवेळी अशी आंदोलने होत असली तरी अधिकारी मात्र यामधून काहीही शिकलेले दिसत नाहीत.
ठाकुर्ली स्थानकात सकाळीच प्रवाशी कामावर जात असतानाच पेन्टाग्राफ तुटल्यावर सिएसटी कडे जाणारी लोकल सेवा बंद पडली. हि लोकल सेवा त्वरित सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने म्हणावे तसे तातडीने प्रयत्न केले नाहीत. धीम्या गतीच्या गाड्या फास्ट मार्गावरून वळवण्यात आल्यामुळे दिवा, मुंब्रा, कलवा या स्थानकावर फास्ट मार्गावर प्ल्याटफॉर्म नसल्याने सकाळी गर्दीच्या वेळी गाड्या थांबू शकत नव्हत्या. अश्या वेळी या तीन स्थानकात प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली होती.
सकाळीच कामावर जाताना लेट मार्क लागेल, उशिरा पोहोचलो तर मालक किंवा वरिष्ठ अधिकारी फैलावर घेतील म्हणून प्रत्तेकजण आपली नेहमीची ठरलेली लोकल पकडत असतात. परंतू नवीन वर्षाच्या दुसर्याच दिवशी प्रवाश्यांना सकाळी कामावर जाताना एकही लोकल येत नसल्याचे समजल्यावर प्रवाश्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आणि प्रवाश्यांनी फास्ट मार्गावरून जाणाऱ्या लोकल लोकल दिवा स्थानकात थांबवल्या.
फास्ट मार्गावरून जाणाऱ्या लोकल दिवा स्थानकाजवळ थांबवून प्रवाश्यां चा संताप इथेच संपला नाही. त्यांनी तिकीट खिडक्या, एटीव्हीएम मशीन, स्टेशन मास्टर कार्यालय, ट्रेन यांना लक्ष करत दगड फेक करून रेल्वेच्या संपत्तीची प्रचंड प्रमाणात नासधूस केली. रेवेप्रमानेच इतर खाजगी गाड्याही जाळण्यात आल्या यामध्ये पोलिसांच्या गाडीचाही सामाबेश आहे. या मध्ये दिवा आणि डोंबिवली स्थानकातील १३ एटीव्हीएम मशीन, दोन तिकीट घर, १० लोकल गाड्या, उदघोषणा करणारी यंत्रणा, दिवा स्थानकातील फाटक गेट याची तोड फोड करण्यात आली.
रेल्वे प्रवाश्यांनी संताप व्यक्त केला आणि प्रवाश्यांनी रेल्वेचे नुकसान केले असे असे बोलले जात होते. परंतू तपासा नंतर स्थानिक काही असामाजिकतत्वांनी रेल्वेचे नुकसान केल्याचे समोर आले आहे. अश्या या लोकांनी महिला प्रवाश्यानाही मारहाण केली आहे. पोलिस आणि खाजगी गाड्या जाळल्या आहेत. हे पाहता येथील असामाजिकतत्वांनी प्रवाश्यांचा फायदा उचलून रेल्वेला नुकसान पोहचवण्याचा आपला हेतू सध्या केला आहे.
दिव्यामधून दरदिवशी एक लाख प्रवाशी प्रवास करतात. येथील रहिवाश्यांनी कसलाही विचार न करता मोठ्या प्रमाणात येथे घरे खरेदी केली आहेत. हि घरे मोठ्या प्रमाणत अनधिकृत आहेत. यामुळे आधीच येथील रहिवाशी फसलेले आहेत. इथे मोठ्या प्रमाणात बांधकाम होत असून आधीच लोक फसली असल्याने नव्याने कोणीही घरे खरेदी करत नाहीत अशी परिस्थिती आहे. आपला धंदा मंदावल्याने बिल्डर लॉबीसुद्धा धास्तावलेली आहे. नवीन लोक येथे राहायला येत नसली तरी मोठ्या प्रमाणात आधी राहणारे रहिवाशी प्रवाशी म्हणून लाखोंच्या संखेने दिवा स्थानकातून प्रवास करत आहेत.
या लाखो प्रवाश्यांसाठी दिव्यावरून सिएसटीला जाणारी लोकल सोडावी अशी मागणी गेले कित्तेक वर्षे केली जात आहे. याच दिवा स्थानकातून रेल्वे प्रशासनाकडून कोकणात जाणाऱ्या गाड्या सोडल्या जात असल्या तरी फास्ट लोकल थांबण्यासाठी साधे प्ल्याटफॉर्म बांधण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. आज या ठिकाणी किंवा मुंबई मध्ये कित्तेक ठिकाणी ३ व ४ नंबर वर फास्ट लोकल थांबवण्यासाठी प्ल्याटफॉर्मच नाही आहे. धीम्या ट्रयाकवर काही घडल्यास फास्ट मार्गावरून लोकल चालवायची झाल्यास कित्तेक स्थानकात प्ल्याटफॉर्म नसल्याने लोकल थांबवताच येवू शकत नाही अशी परिस्थिती आहे.
रेल्वेने जर दिव्या सारख्या असंख्य स्थानकात ३ व ४ नंबरवर जागा असून देखील प्ल्याटफॉर्म बांधले नसल्याने येथील प्रवाश्यांना स्लो लोकल वर अवलंबून रहावे लागत आहे. त्यातच स्लो मार्गावर काही झाले आणि लोकल बंद पडल्या तर प्रवाश्यांना लोकल सुरु होत नाही तो पर्यंत कोठेही जाता येत नाही हे सत्य आहे. अश्या वेळी प्रवाश्यांना स्थानकात चांगल्या सुविधा देणे, एखादा मार्ग बाद पडला तर दुसऱ्या मार्गावरील प्ल्याटफॉर्मवर लोकल थांबवून प्रवाश्यांना रेल्वेने सुविधा द्यायला हवी होती.
अशी सुविधा देण्यास अपयशी असलेल्या रेल्वेने आणि रेल्वेच्या जन संपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी रेल्वेची बाजू मांडताना येथील प्रवाश्यांनाच दोष दिला आहे. प्रवाशांनी एका लाईन बंद होती, थोडे सहकार्य केले असते आणि आंदोलन केले नसते तर इतर तीन लाईन चालू ठेवता आल्या असत्या असे म्हटले आहे. येथील प्रवाश्यांना फक्त रेल्वेवरच अवलंबून राहावे लागते. राज्य सरकारने या ठिकाणच्या प्रवाश्यांसाठी पर्यायी समांतर मार्ग करायला हवा होता असे सांगत रेल्वेची काही जबादारी नाही असे स्पष्ट करून सगळी जबाबदारी राज्य सरकारवर ढकलली आहे.
रेल्वे प्रवाश्यांना काय त्रास होतात, प्रवाशी कसे प्रवास करतात, त्यांच्या समस्या काय हे वातानुकुलीत बसलेल्या आणि वातानुकुलीत आपल्या खाजगी गाड्यांमधून ये जा करणाऱ्या रेल्वेच्या बड्या अधिकारयांना माहित नसणार म्हणून ते अशी वक्तव्य करत आहेत. या वातानुकुलीत दालनात बसलेल्या अधिकाऱ्यांनी प्रवाश्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीमधून प्रवाशी कसे प्रवास करतात, एखादी लोकल वेलेवर आली नाही तर प्रवाश्यांचे किती नुकसान होते याची जाणीव या अधिकाऱ्यांनी ठेवण्याची गरज आहे.
दिवा आणि डोंबिवली मध्ये जे आंदोलन प्रवाश्यांनी केले आणि नंतर त्याचा फायदा असामाजिक तत्वांनी घेतला यामध्ये शेवटी रेल्वेचेच नुकसान झाले आहे. रेल्वेचे हे नुकसान होण्यापासून अधिकाऱ्यांना थांबवता आले असते. परंतू अधिकाऱ्यांमध्ये इच्छाशक्ती नसल्याने रेल्वेचे नुकसान होण्यापासून थांबवता आलेले नाही. रेल्वे अधिकाऱ्यांनी या आंदोलनापासून काही बोध घेण्याची गरज आहे. प्रवाशांच्या संतापाचा बांध कधीही फुटू शकतो हा संतापाचा बांध फुटण्या आधीच प्रवाश्यांना चांगली व वेळेवर सुविधा दिल्यास अशी आंदोलने रोखता येवू शकतात.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३
No comments:
Post a Comment