मुंबई : वेतनवाढीसह अनेक प्रलंबित मागण्या अद्यापि मान्य न झाल्याने देशभरातील बँक कर्मचार्यांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे. बुधवार, ७ जानेवारीला देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचार्यांनी लाक्षणिक संप पुकारला असून मागण्या मान्य न झाल्यास येत्या काळात बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू)चे संयोजक विश्वास उटगी यांनी यासंदर्भातील माहिती देताना म्हटले की, वेतनवाढीसह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यावर अद्यापि तोडगा काढण्यात आला नाही. वारंवार चर्चेच्या फेर्या झाडत अन् संपाचे हत्यार उपसून सरकारकडे बँक कर्मचार्यांच्या समस्यांसाठी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु अद्यापि त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. परिणामी आता ७ जानेवारीला एक दिवसाचा संप पुन्हा पुकारला जाणार आहे. परंतु तरीदेखील त्याकडे सरकारने लक्ष न दिल्यास या महिन्याच्या अखेरीस बेमुदत संप पुकारला जाईल, असे उटगी यांनी म्हटले आहे.