पाच वरिष्ठ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 January 2015

पाच वरिष्ठ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या

मुंबई ( जेपीएन न्यूज ) : राज्य सरकारने बुधवारी पाच वरिष्ठ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून, त्यासंबंधीचे आदेश काढण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने गृह, महिला व बालकल्याण आणि सामाजिक न्याय या विभागात अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

गृह विभागाचे अतिरिक्त सचिव म्हणून के.पी. बक्षी यांची नेमणूक करण्यात आली आहे. के. पी. बक्षी यांची गृह विभागाचे अतिरिक्त सचिव म्हणून, तर विजय कुमार यांची प्रधान सचिव,वित्तीय सुधारणापदी बदली करण्यात आली आहे. अल्पसंख्याक विभागाच्या प्रधान सचिव म्हणून जयश्री मुखर्जी तर महिला व बालकल्याण विभागाच्या प्रधान सचिवपदी संजय कुमार यांची नेमणूक करण्यात आली आहे. उज्ज्वल उके यांची सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

Post Bottom Ad