कल्याण-ठाकुर्ली दरम्यान पेंटाग्राफ तुटल्याने आधीच गोंधळ उडाला असताना दिवा येथे संतप्त प्रवाशांनी रेल रोको आंदोलन सुरू केल्याने मध्य रेल्वे मार्गावरील धीम्या व जलद गाड्यांची ठाण्यापर्यंतची वाहतूक अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे. दिवा येथे दगडफेक करतानाच प्रवाशांनी पोलीसांची गाडीही जाळली असून जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याने परिस्थिती आणखीच चिघळली आहे. दरम्यान, दगडफेकीत मोटरमन जखमी झाला असल्याचे सांगण्यात आले.
नव्या वर्षातही मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी रखडपट्टी पाचवीला पुजलेली दिसत आहे. आज ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा वाजले. कल्याण आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा या स्थानकांमध्ये हजारो प्रवाशी अडकले. याबाबत बराच वेळ रेल्वेकडून कोणतीही उद्घोषणाही केली जात नव्हती. त्यामुळेच दिवा स्थानकात रखडलेल्या प्रवाशांच्य असंतोषाचा भडका उडाला. संतप्त प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून आंदोलन सुरू केले. प्रवाशांनी आपला राग थेट लोकलवर काढला. लोकलवर दडगफेक करण्यात आल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी प्रवाशांवर सौम्य लाठीमार केल्याने सध्या परिस्थिती चिघळलेली असून चार खासगी गाड्याही जमावाने जाळल्या आहेत. या आंदोलनामुळे दिवा-कल्याण दरम्यान गाड्यांची लांबच लांब रांग लागली आहे. प्रवाशांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतूक अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्याचवेळी ठाणे-छत्रपती शिवाजी टर्मिनसदरम्याची वाहतूक कासवगतीने सुरू आहे. दरम्यान, लांब पल्लाच्या गाड्यांनाही या गोंधळाचा फटका बसला असून डेक्कन क्वीन आणि पंचवटी एक्स्प्रेस कल्याणजवळ खोळंबल्या आहेत.
महिला डब्यावर दगडफेक
आंदोलकांनी महिला डब्यावर दगडफेक केल्याची माहिती महिला प्रवाशांकडून देण्यात आली. दगडफेकीत मोटरमन जखमी झाला आहे. दिवा रेल्वे स्थानक तसेच चारही ट्रॅक सध्या रोखले गेलेले आहेत. हजारो प्रवाशी ट्रॅकवर आहेत. पोलिसांच्या लाठीमारानंतर परिस्थिती आणखीच चिघळली आहे. दिव्यातील स्थानिक पुढारीही आंदोलनात उतरलेत. स्टेशनबाहेर एक पोलीस व्हॅन तसेच तीन खासगी गाड्या जाळण्यात आल्या. घटनास्थळी तीन फायर इंजिन व वॉटर टॅंकरसही अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत.
आंदोलन थांबेपर्यंत लोकलसेवा बंदच
आंदोलन थांबेपर्यंत ठाण्याच्यापुढे लोकल धावणार नाहीत, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. सकाळी पेंटाग्राफ तुटल्याने एकाच मार्गावर समस्या होती. यादरम्यान, धीम्या मार्गावरची वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आली होती. बिघाड आता दुरूस्तही झाला आहे. मात्र, दिव्यात काही समाजकंटकांनी रस्त्यावर उतरून ट्रॅक रोखल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या आंदोलकांनी चारही मार्ग अडवल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून ही स्थिती निवळेपर्यंत वाहतूक सुरू केली जाणार नाही, असे पाटील म्हणाले.