नवी दिल्ली : राजकीय पक्षांना देण्यात आलेली जमीन, बंगले व स्थावर मालमत्तेचा तपशील शहर विकास मंत्रालयाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर करण्याचे निर्देश केंद्रीय माहिती आयोगाने दिले आहेत. लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने पक्षाच्या मुख्यालयाचे 'राबडी भवन' असे नामकरण केल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत माहिती आयोगाने हे निर्देश दिले आहेत.
सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षांना देण्यात आलेल्या मालमत्तेसंबंधीचे दस्तावेज, पत्रव्यवहार, मार्गदर्शक तत्त्वे आणि परिपत्रके तसेच यासंबंधीची आवश्यक ती सर्व माहिती केंद्रीय शहर विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात यावी, असे निर्देश दिल्याचे माहिती आयुक्त यशोवर्धन आझाद यांनी रविवारी सांगितले. शहर विकास मंत्रालयाच्या सचिवांना या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आरजेडीच्या मुख्यालयाचे 'राबडी भवन' असे नामकरण करण्यास विरोध करत सामाजिक कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी या इमारतीविषयी माहिती मागितली होती. त्यावर राष्ट्रीय जनता दलाला अशाप्रकारे कोणतीही मालमत्ता देण्यात आलेली नसल्याची माहिती समोर आली. त्यानंतर निर्माण झालेल्या वादाची माहिती आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. तसेच अशा प्रकरणात सरकारकडून होणारे मालमत्तेचे वाटप आणि भाडेतत्त्वावर दिलेली मालमत्ता यांचा तपशील जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.