एलइडी दिव्याच्या प्रस्तावावरून सेना भाजपा आमनेसामने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 January 2015

एलइडी दिव्याच्या प्रस्तावावरून सेना भाजपा आमनेसामने

मुंबई / प्रतिनिधी
शिवसेना आणि भाजपा सत्तेत सहभागी असताना मुंबई महानगर पलिकेमधील सेना आणि भाजपा मात्र एलइडी दिव्याच्या प्रस्तावावरून आमनेसामने आली आहे. भाजपाने केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने आणलेला या प्रस्तावाला शिवसेनेने विरोध केला आहे. पालिकेच्या अधिकारावर घाला असल्याचे सांगत मुख्यामंत्र्यानी हा प्रस्तावच रद्द करावा अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.



मुंबई महानगर पालिका २५० कोटी रुपये खर्चून टेंडर न मागवता मुंबई मधे एलइडी दिवे लावणार आहे असे भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आणि पलिकेतील भाजपाचे गटनेते मनोज कोटक यानी पत्रकार परिषद् घेवुन जाहिर केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने हे दिवे लावणार असेही यावेळी जाहिर करण्यात आले आहे. भाजपाने सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेला विश्वासात न घेता अशी घोषणा केल्याने सेने मधे नाराजी पसरली आहे. शिवसेनेला विश्वासात न घेतल्याने आणि पालिकेचे अधिकार काढून घेण्याचा भाजपा प्रयत्न करत असल्याने शिवसेनेने या प्रस्तावाला विरोध केला आहे. मुंबई महानगर पालिकेला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून राज्य घटनेने विशेष अधिकार आहेत. हे अधिकार राज्य सरकार  हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र आणि राज्य सरकार पालिकेला विश्वासात न घेता पालिकेच्या अधिकारावर घाला घालत असल्याने माजी महापौर व आमदार सुनील प्रभु यानी मुख्यमंत्र्याना निवेदन देवून एलइडी दिवे लावण्याचा प्रस्ताव स्थगित करावा अशी मागणी केली आहे. 

Post Bottom Ad