मुंबई : लोककला अकादमी आणि शाहीर अमरशेख अध्यासनातर्फे आंतरराष्ट्रीय लोकरंग परिषदेचे मुंबई विद्यापीठात आयोजन करण्यात आले आहे. १४ ते १७ जानेवारीदरम्यान ही परिषद भरणार आहे. आयएसटीआर या संस्थेच्या सहकार्याने डॉ. रवी चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद भरणार आहे.
या परिषदेत ऑस्ट्रेलिया, अमेरिका, रशिया आदी देशांतील रंगभूमी विषयक सुमार दीडशे अभ्यासक सहभागी होणार आहेत. कलिना विद्यानगरी परिसरातील मराठी भाषा भवन सभागृहात या परिषदेचे प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्रा यांच्या १४ जानेवारी रोजी उद््घाटन होणार आहे. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक प्रा. कमलाकर सोनटक्के या वेळी बीजभाषण करणार आहेत. आंतरराष्ट्रीय लोकरंग परिषदेला डॉ. जवाहरलाल हंडू, प्रा. वामन केंद्रे, प्रा. दत्ता भगत, डॉ. विश्वनाथ शिंदे, रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष राम जाधव आदींसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत