पालिका अतिरिक्त आयुक्त खारगेंची वनखात्यात बदली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 January 2015

पालिका अतिरिक्त आयुक्त खारगेंची वनखात्यात बदली

मुंबई महापालिकेत तीन महिन्यांपूर्वी रुजू झालेले अतिरिक्त आयुक्त विकास खारगे यांची नववर्षाचा सूर्योदय होण्याआधीच बदली करण्यात आली. राज्य सरकारच्या वन विभागात बुधवारी रात्रीच त्यांची बदली करण्याचे आदेश सरकारने काढले. अतिरिक्त आयुक्तपदावरील सनदी अधिकार्‍यांचा कार्यकाल तीन वर्षांचा असताना अवघ्या तीन महिन्यांत खारगे यांची बदली वनविभागात सचिवपदी झाल्यामुळे पालिका वतरुळात तर्कवितर्क लावले जात होते. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सचिव म्हणून कार्यरत असलेल्या खारगे यांची १ ऑक्टोबर २0१४ रोजी पालिकेत अतिरिक्त आयुक्तपदावर नियुक्ती झाली. महापालिकेत रुजू झाल्यावर त्यांनी स्वच्छता अभियान हिरिरीने राबवले. पालिका मुख्यालयातील प्रत्येक विभागात व प्रत्येक कार्यालयांमध्ये जाऊन त्यांनी कर्मचार्‍यांना स्वच्छता आणि साफसफाईचे धडे गिरवण्याची सवय लावली. पालिकेच्या २0१४ रोजी पालिकेत अतिरिक्त आयुक्तपदावर नियुक्ती झाली. महापालिकेत रुजू झाल्यावर त्यांनी स्वच्छता अभियान हिरिरीने राबवले. पालिका मुख्यालयातील प्रत्येक विभागात व प्रत्येक कार्यालयांमध्ये जाऊन त्यांनी कर्मचार्‍यांना स्वच्छता आणि साफसफाईचे धडे गिरवण्याची सवय लावली. पालिकेच्या २४ विभाग कार्यालयातही आपापल्या विभागांमध्ये दर शनिवारी कर्मचार्‍यांना साफसफाई करण्याची सवय त्यांनी लावली होती. खारगे यांच्या बदलीमुळे त्यांचा परिमंडळ एक आणि दोनचा कार्यभार सध्या अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्याकडे व शिक्षण विभाग आणि अन्य विभागांचा कार्यभार अतिरिक्त आयुक्त एस.व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS