नव्या धोरणानुसार मुंबईकरांना घरासमोरच वाहनाचे पार्किंग करता येणार आहे. मात्र त्या रस्त्याचा वापर त्याच भागात इमारती असलेल्या स्थानिक रहिवाशांनाच करता येणार आहे. महापालिकेच्या संबंधित विभागांची अनुमती मिळाल्यानंतरच घरासमोरच पार्किंग करता येईल.
रहिवासी वाहनतळ योजनेला पालिकेने तत्त्वत: मान्यता दिल्यास कंत्राटदार किंवा सल्लागारांची नियुक्ती करून त्यांना पूर्व/पश्चिम आणि शहरातील जागांची पडताळणी करण्याचे काम सोपवण्यात येईल. या योजनेत एका दिशेने एकच मार्गिका वाहने उभी करता येतील. ही योजना राबवण्याचा निर्णय झाल्यास पालिकेच्या प्रभाग कार्यालयातर्फे त्यासाठी वाहतूक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेण्यात येणार आहे व ही योजना रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेतच असणार आहे. एका व्यक्तीसाठी एकच वाहनतळ परवाना देण्यात येईल आणि वाहन इतरत्र उभे केल्यास वा दुसरे वाहन त्याच ठिकाणी केल्याचे आढळल्यास ५0 रुपये दंड आकारणी करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने येत्या ३ वर्षांत अनेक ठिकाणी बहुमजली पार्किंगतळ बांधण्याचे प्रस्ताविले असून, ही संकुले सरकारी आणि खाजगी भागीदारी (पीपीपी) तंर्गत बांधण्याचे प्रस्ताविले आहे. या योजनेत पार्किंगचे दर निश्चित करण्यात येणार असल्याने कंत्राटदाराला ग्राहकांना लुटता येणार नाही.