मुंबई - ठाणे जिल्ह्यात रेल्वेप्रवाशांची संख्या मागील १० वर्षात ५ पट वाढली आहे.रेल्वे प्रवाशांच्या अनेक समस्या प्रलंबीत आहेत.त्या समस्या प्राधान्याने सोडवाव्या ठाणे जिल्ह्यात रेल्वे मार्गावर येणारा ज्यादा भार दूर करण्यासाठी या जिल्ह्यात रेल्वेला पर्याय ठरणारे दळणवळणाचे साधन उभारले पाहिजे.घाटकोपर ते कल्याण तसेच अंधेरी ते नालासोपारापर्यंत नवीन मेट्रोरेल्वे मार्ग उभारावेत अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते खासदार रामदास आठवले यांनी केली आहे.
ठाणे-कल्याण येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने रेल्वेप्रवाशांची भर पडत आहे.मुंब्रा-कळवा-दिवा या भागात प्रंचंड प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे.येथे स्वतंत्र दिवा सीएसटी लोकल सुरु करावी.मध्यरेल्वे मार्गावर वारंवार बिघाड होण्यामागे निकृष्ठ साहित्य वापरले गेले आहे.त्यामुळे मध्यरेल्वेने अधीक निधी वापरुन उत्कृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करुन रेल्वे मार्गाचे नुतनी करावे यासह अनेक रेल्वेप्रवाशांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना देवेद्र फडवणीस आणि रेल्वेमंत्री ना सुरेश प्रभू यांची आपण भेट घेणार आहोत. प्रलंबीत समस्यांमुळेच प्रवाशांचा उद्रेक होतो. त्यामुळे या समस्या त्वरेने सोडवण्यासाठी रिपब्लिकन पक्ष पाठपुरावा करत आहे असे खासदार रामदास आठवले यावेळी म्हणाले.