डॉ. मुखर्जी यांनी पदभार स्वीकारला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 January 2015

डॉ. मुखर्जी यांनी पदभार स्वीकारला

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून डॉ. संजय अजयकुमार मुखर्जी यांनी पदभार स्वीकारला. महापालिका प्रशासनाच्या वतीने आयुक्त सीताराम कुंटे यांनी मुखर्जी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी उपआयुक्त (सामान्य प्रशासन) किरण आचरेकर उपस्थित होते. 


डॉ. मुखर्जी १९९६च्या भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. त्यांचा जन्म ७ मार्च, १९७२ रोजी झाला. नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएस ही पदवी प्रथम श्रेणीसह प्राप्त केली आहे. तसेच बी.ए. (पब्लिक अँडमिनिस्ट्रेशन) ही पदवीदेखील नागपूर विद्यापीठातून संपादित केली आहे. आयएएस उत्तीर्ण केल्यानंतर सर्वप्रथम त्यांची नियुक्ती सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून ठाणे (जि. ठाणे) येथे करण्यात आली. त्यानंतर डहाणू येथे उपविभागीय अधिकारी, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगावचे जिल्हाधिकारी, हातमाग व वस्त्रोद्योग विभागाचे संचालक, नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त, नागपूर विमानतळ विकास कंपनीचे सह व्यवस्थापकीय संचालक, नागपूरचे जिल्हाधिकारी, नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष तसेच राज्य उत्पादन शुल्क (मुंबई) खात्याचे आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

Post Bottom Ad