मुंबईत रस्त्यांवरील दिव्यांमुळे वीस कोटी युनिट वीज वर्षाला जळते त्यापैकी तब्बल दहा कोटी युनीटची बचत करून मुंबई येत्या नऊ महिन्यात लख्ख एलईडी दिव्यांनी उजळून निघणार आहे. केंद्रीय उर्जामंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या प्रयत्नाने राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नव्या वर्षात भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्याकडून मुंबईकरांना ही भेट देण्यात येत आहे अशा शब्दात पियुष गोयल यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदिल दाखविला.
मुंबईत सुमारे 1 लाख 32 हजार 458 रस्त्यावरच्या दिव्यांचे खांब आहेत हे सर्व दिवे येत्या आठ महिन्यात बदलून एलईडी हे उर्जा बचत करणारे दिवे बसविण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई महापालिकेला सध्या एकही रूपया खर्च करावा लागणार नाही. उलट वीजेसह महापालिकेचे पैशांची बचत होणार आहे.
केंद्र शासन पुरस्कृत एनर्जी इपिशिएनसी सर्विसेस लिमिटेड(ईईएसएल) ही कंपनी हे काम करणार असून अवघ्या सात महिन्यात मुंबईतील सर्व दिवे बदलण्याची जबाबदारी या कंपनीने घेतली आहे तर पायलट प्रकल्प म्हणून बांद्रा,मुलुंड आणि कुलाबा या ठिकाणाहून या कामाला सुरूवात होणार आहे तर येत्या वीस दिवसात मरिन ड्राईव्हवरील सर्व दिवे बदलण्यात येणार असून त्या प्रकल्पाचे उद्घघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते येत्या 31 जानेवारीला होणार आहे
मुंबईत बेस्टचे 39 हजार 603 रिलायन्सचे 80 हजार 209 आणि एमईसीबीचे 12 हजार 652 दिवे असून त्यापोटी वर्षाला 164 कोटी रूपये खर्च येतो. मात्र या प्रकल्पामुळे या संपुर्ण पैशांची बचत होणार असून हे दिवे बसवून देणारया कंपनीला पुढील सहा महिन्यात एकूण बचतीच्या चाळी टक्के रक्कम द्यावी लागणार आहे. त्यामुळे महापालिकेवर कोणताही आर्थिक बोजा येणार नाही विशेष म्हणजे हे दिवे ऑपरेट करण्याची जबाबदारी हीच कंपनी घेणार असून संपुर्ण ऑपरेटींग सिस्टीम कंम्युटराईज करण्यात करण्यात येणार आहे त्यामुळे सध्या ऑपरेटीव्ह पार्टमुळे होणारा वीज युनीटचा तोटाही भरून निघणार आहे
मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करीत होते. दिल्लीत हा प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर मुंबईतही हा प्रकल्प सुरू करण्यात यावा अशी मागणी त्यांनी पियुष गोयल यांच्याकडे केली होती.
शुक्रवारी मुंबई भेटीवर असणारया केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी मंत्रालयात राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात संयुक्त बैठक घेवून ही योजना तात्काळ मुंबईत लागू करण्याचे निर्देश दिले या बैठकीला आमदार आशिष शेलार यांच्यासह पालिका गटनेते मनोज कोटक, महापालिका आयुक्त सिताराम कुंटे, बेस्टचे महाव्यवस्थापक , एमईसीबीचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुंबई महापालिका मुख्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार अॅड आशिष शेलार यांनी ही माहिती दिली.