मुंबई - दिवा स्थानकात काल पेंटाग्राफ तुटल्यानंतर प्रवाशांनी केलेल्या हिंसक आंदोलनानंतर ईशान्य मुंबईचे खासदार डॉ किरीट सोमैया यांनी आज मध्य रेल्वेचे अतिरिक्त व्यवस्थापक त्रिपाठी यांची भेट घेतली.
मध्य रेल्वेच्या तांत्रिक बाबी या आधीच दुरस्त व्हावयला हव्या होत्या याबाबत प्रवाशांचे म्हणणेही खरेच आहे. अपुरी साधऩसामुग्रीमुळेच दुरुस्तीची कामे रखडली. मात्र या पुढील काळात 5 आठवड्यात ही दुरुस्ती पूर्ण होईल, असे आश्वासन त्रिपाठी यांनी दिले आहे. मध्य रेल्वे पूर्णपणे सुरळित होण्यासाठी 8 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यताही त्रिपाठी यांनी वर्तवली आहे.
ठाण्याच्या पुढे केवळ 4 ट्रॅक असल्याने पॅसेंजर आणि उपनगरीय रेल्वेच्या वाहतुकीत अनेक अडचणी निर्माण होतात. मात्र लवकरच ठाण्याच्या पुढील पाचव्या आणि सहाव्या लाईनचे काम पूर्ण करण्यासाठी खा. सोमैया प्रयत्न करणार आहेत.