११३ जाहिराती कारवाईच्या कचाट्यात! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 January 2015

११३ जाहिराती कारवाईच्या कचाट्यात!

मुंबई : टीव्हीवर दाखवण्यात येणार्‍या गुडनाइटच्या जाहिरातीत एक मूल मॉस्किटो व्हेपोरायझरच्या जवळ उभे राहिलेले दाखवले आहे. परंतु उत्पादनाच्या माहितीपत्रकात इलेक्ट्रिकल लिक्विड व्हेपोरायझिंग मशीन मुलांपासून दूर ठेवण्याची सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जाहिरातीतील विरोधाभासामुळे सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून बेजबाबदारीला प्रोत्साहन देण्यात आले आहे. अशा ग्राहकांची दिशाभूल करणार्‍या तब्बल ११३ फसव्या जाहिरातींवर अँडव्हर्टायझिंग स्टॅण्र्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया (एएससीआय)च्या ग्राहक तक्रार कौन्सिलकडून (सीसीसी) दखल घेतली असून लवकरच त्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.


दूरचित्रवाणी, वृत्तपत्रांवर दिसणार्‍या भडक जाहिरातींमुळे ग्राहक वर्ग लागलीच त्याकडे आकर्षित होतो. जाहिरात पूर्णपणे खरी असेल असा समज करून अनेक ग्राहक त्या कंपनीचे ते उत्पादन खरेदी करतात. मात्र नंतर त्यांची फसवणूक झाली असून जाहिरात फसवी असल्याचे सिद्ध होते. अशा एक ना अनेक जाहिरातींवर कारवाईचा बडगा उगारण्यास सीसीसी पुढे सरसावली आहे. सीसीसीकडे एकूण १४४ जाहिरातींविरोधात तक्रार दाखल झाली होती. त्यापैकी ११३ जाहिराती फसव्या असल्याचे निदर्शनास आले असून त्यामध्ये सर्वाधिक जाहिराती वैयक्तिक आणि आरोग्यसेवेशी निगडित आहेत. त्यापाठोपाठ शिक्षण क्षेत्राशी ३३ जाहिराती संबंधित आहेत. आरोग्य आणि वैयक्तिक काळजी उत्पादने किंवा सेवांच्या ५८ जाहिरातदारांच्या जाहिरातीबाबतच्या दाव्यांमध्ये सीसीसीला त्या एकतर गैरसमज करून देणार्‍या किंवा खोट्या किंवा पुरेशा/वैज्ञानिकदृष्ट्या सबळ नसलेल्या आणि त्यामुळे एएससीआयच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या आढळल्या. काही आरोग्य सेवा उत्पादने आणि सेवांच्या जाहिरातींनी औषधे आणि जादूटोणा विरोधी कायद्यांचे व एएससीआय कोडचे उल्लंघन केल्याचेही आढळले. 

पान बहार पान मसाल्याची जाहिरात जगातील एकमेव पुरस्कार विजेता असल्याचा दावा करणारी आहे. तसेच ही जाहिरात कायद्याचे उल्लंघन करणारी असून त्यात धोक्याची सूचना दिलेली नाही. पतंजली दंतकांती ज्युनिअर १00 टक्के एसएलएसमुक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यात असाही दावा करण्यात आला आहे की, या उत्पादनात नैसर्गिक वनौषधी आहेत. एसएलएस टूथपेस्टमुळे होणारा मेंदूचा कर्करोग, रक्ताचा कर्करोग, त्वचा आणि हाडांचा कर्करोग या आजारांपासून संरक्षण करते. सीसीसीला ३३ विविध जाहिरातदारांच्या जाहिरातींबाबतचे दावे सिद्ध झाले नसल्याचे आढळले. एएससीआयच्या अँडव्हर्टायझिंग ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे या जाहिरातदारांविरोधातील तक्रारी ग्राह्य धरण्यात आल्या. यामध्ये अर्कोट श्री महालक्ष्मी विमेन्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, महानंदी एज्युकेशन सोसायटी (रायपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी- आरआयटीईई), ब्राइट करिअर अँकॅडमी आदींचा समावेश आहे. जे.के. वॉल पुट्टीच्या जाहिरातीत 'सीलनमें भी पपडी का कोई चान्स नहीं' असा दावा करण्यात आला होता. हा दावा तांत्रिक पुराव्यांनिशी सिद्ध करता आला नाही.

Post Bottom Ad