मुंबई (प्रतिनिधी)- विविध साथरोगांच्या किंवा इबोला सारख्या महाभयंकर रोगाच्या प्रतिबंधासाठी आणि नियंत्रणासाठी महापालिका सदैव तयार असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले.
तसेच महापालिकेच्या जोगेश्वरी येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये,चिंचपोकळीतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये इबोला रुग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यातआला असून दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दहा खाटा आणि राज्य सरकारच्या जे.जे. रुग्णालयातही व्यवस्थाकरण्यात आल्याचे देशमुख म्हणाले. महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत असणाऱ्यासाथरोग नियंत्रण कक्षाद्वारे प्रसार-माध्यम प्रतिनिधींसाठी आयोजित करण्यात आलेल्या इबोला विषाणूविषयक कार्यशाळे दरम्यान ते बोलत होते. याप्रसंगी कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर,लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ.सुजाता बावेजा, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यसेवेतील सहाय्यक संचालक डॉ.बी.एस.कांबळे आणि डॉ. के.आर. खरात आदी उपस्थित होते.
इबोला रुग्ण हाताळणीबाबत आणि इबोला विषाणूजन्य आजांराबाबत पालिकेने आरोग्य सेवा व वैद्यकियसेवेतील सुमारे एक हजार लोकांना प्रशिक्षण दिले आहे. इबोला विषाणू विषयक प्राथमिक माहितीचेसंगणकीय सादरीकरणाद्वारे केले. तसेच इबोला विषाणूबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना व संसर्गरोखण्यासाठी काय काळजी घ्यावी, याची माहिती देखिल देण्यात आली. या कार्यशाळेत डॉक्टर्स, मेट्रन,परिचारिका, वॉर्डबॉय यांच्यासह रुग्णवाहिकेच्या चालकांना देखील इबोला विषयक प्रशिक्षण देण्यात आले.