गॅसधारकांची सबसिडी गुरुवारपासून बँक खात्यात जमा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 January 2015

गॅसधारकांची सबसिडी गुरुवारपासून बँक खात्यात जमा

मुंबई : घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी ग्राहकांच्या खात्यात थेट जमा करण्यासाठी केंद्र शासनाने गुरुवारपासून मॉडिफाईड डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर योजना (एमडीबीटीएल) देशभर लागू केली असून मुंबई शिधावाटप क्षेत्रातील गॅसधारकांची सबसिडी थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शिधावाटप नियंत्रक श्‍वेता सिंघल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
गॅस ग्राहकांना मिळणारी सबसिडी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असून त्यासाठी ग्राहकांनी त्यांचा आधार क्रमांक, बँक खाते या संबंधीची माहिती संबंधीत एलपीजी गॅस वितरकाकडे तत्काळ जमा करून त्याची दुसरी प्रत ज्या बँकेत आपले खाते आहे, त्या बँकेत जमा करावी. ग्राहकांना आता बाजार भावाप्रमाणेच गॅस सिलिंडर घ्यावा लागेल. त्याची सबसिडी आपल्या खात्यात जमा होणार असल्याने गॅस सिलिंडरचा भ्रष्टाचारही कमी होईल. एखाद्या ग्राहकाकडे आधारकार्ड नसेल तरीही ही योजना गुरुवारपासून लागू होणार असून ग्राहकांनी आपले बँक खाते काढून त्याबाबत योग्य ती कार्यवाही त्वरित पूर्ण करावी. ग्राहकांना या योजनेमध्ये सहभागी होण्यास काही अडचण असल्यास त्यांनी नियंत्रक शिधावाटप कार्यालय (हेल्पलाईन क्र.0२२-२२८५२८१४) या क्रमांकावर तसेच सर्व उपनियंत्रक शिधावाटप कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही सिंघल यांनी या वेळी केले.

Post Bottom Ad

JPN NEWS