मुंबई : वजन घटवणे, उंची वाढवणे आणि इतर शारीरिक विकारांवर त्वरित उपाय करू सांगणार्या जाहिरातींचा सध्या खाजगी वाहिन्यांवर मोठय़ा प्रमाणावर सुळसुळाट झाला आहे. यासारख्या उत्पादनांमुळे शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भ्रामक जाहिरातींवर बंदी घालण्यात यावी, अशी सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली आहे. अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया ओरिजीनच्या वतीने (एएपीआय) आयोजित करण्यात आलेल्या ९ व्या जागतिक आरोग्य परिषदेच्या वेळी राज्यपाल बोलत होते.
वैद्यकीय अभ्यासक्रम भारतात पूर्ण करून अमेरिकत जाणार्या डॉक्टरांची संख्या लक्षणीय आहे. भारतीय डॉक्टरांनी अमेरिकेतील वैद्यकीय सेवेत मोलाचे योगदान दिले आहे. अमेरिकेतील भारतीय डॉक्टरांनी सामाजिक दायित्वचे भान ठेवले पाहिजे. त्यानुसार भारतात शैक्षणिक, संशोधन आणि वैद्यकीय अभ्यासक्रमात सुधारणेसाठी सहाय्य करावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी केली. मधुमेहाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, भारतीयांच्या आहारशैलीत बदल करता येईल का? याकडे अमेरिकेतील भारतीय डॉक्टरांनी लक्ष घालावे, असे आवाहन राज्यपालांनी केले. जागतिक आरोग्य परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एएपीआयचे अध्यक्ष डॉ. रवी जहांगीरदार, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय उपस्थित होते.