मुंबई ( जेपीएन न्यूज ) : उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवर तिकिटासाठी प्रवाशांची वाढती गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने मोबाईल तिकीट देण्यास सुरुवात केली आहे. शनिवार, २७ डिसेंबर रोजी मोबाईल तिकिटाचा शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दादर येथे करण्यात आला होता.
त्यानंतर आता मरेच्या आणखी ४ स्थानकांवर मोबाईल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोबाईल तिकिटाची सुरुवात केली आहे. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकापासून याची सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर आता सीएसटी, ठाणे, कल्याण आणि वाशी या स्थानकांवरून प्रवासी मोबाईल तिकीट काढू शकणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.