मुंबई : पॅरिसमधील व्यंगसाप्ताहिक 'चार्ली हेब्डो'च्या कार्यालयावर झालेल्या भीषण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी फेसबुकवरील आक्षेपार्ह फोटो 'ब्लॉक' करण्यास प्रारंभ केला आहे. आतापर्यंत ६५0 फेसबुक 'ब्लॉक' केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्याने दिली. बुधवारी रात्री या साप्ताहिकाच्या कार्यालयावर तीन धार्मिक कट्टरवादींनी हल्ला करून एकूण दहा पत्रकारांची तसेच दोन पोलीस अधिकार्यांची गोळ्या घालून क्रूरपणे हत्या केली. या हत्याकांडाचे वृत्त येथे येताच सावध झालेल्या पोलिसांनी तत्काळ इंटरनेटवरील फेसबुक ब्लॉक करण्यास सुरुवात केली. ज्या आक्षेपार्ह काटरूनमुळे दहशतवाद्यांनी या साप्ताहिकाच्या कार्यालयावर हल्ला केला, ते काटरून फेसबुकवर काही जणांनी प्रसिद्ध केले. यामुळे वातावरण दूषित होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी फेसबुकच ब्लॉक केले.
पॅरिस हल्ल्याची दाहकता लक्षात घेऊन पोलिसांनी सावधानता बाळगून ही कारवाई केल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले. यापूर्वी फेसबुकवरील अनेक आक्षेपार्ह फोटोमुळे दोन समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवाजी महाराज यांच्या छायाचित्रामुळे दोन समाजात वाद निर्माण झाला होता. हा अनुभव लक्षात घेऊन पोलिसांनी कुठलाही धोका न पत्करता फेसबुक ब्लॉक करण्याची कारवाई सुरू केली. पॅरिस हल्ल्याचे वृत्त धडकताच सावध झालेल्या पोलिसांनी फेसबुकवर टाकण्यात आलेल्या फोटोंची कसून पाहणी केली. त्या वेळी सायबर सेलच्या अधिकार्यांना ते आक्षेपार्ह काटरून दिसले. ज्या काटरूनमुळे पॅरिसमधील 'चार्ली हेब्डो' या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या कार्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्या काटरूनमुळे येथील वातावरण दूषित होईल याची भीती पोलिसांना वाटल्यामुळे पोलिसांच्या सायबर सेलच्या अधिकार्यांनी तातडीने पावले उचलून फेसबुकच ब्लॉक करण्यास सुरुवात केली.
पोलिसांच्या या कारवाईमुळे मोठा प्रसंग टळल्याचे बोलले जाते. कारण २00६ साली या साप्ताहिकाने हे काटरून प्रसिद्ध केले होते. त्यामुळे भडकलेल्या दहशतवाद्यांनी या साप्ताहिकाच्या कार्यालयावर हल्ला करून १२ जणांची हत्या केली.