नवी दिल्ली : नवीन वर्षाची खूशखबर म्हणजे विनाअनुदान विकल्या जाणार्या एलपीजी (१४.२ किलो ग्रॅमच्या स्वयंपाकाच्या गॅस) सिलिंडरच्या दरात गुरुवारी ४३ रुपये ५0 पैशांनी कपात करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीने मे २00९ नंतर खालची पातळी गाठण्यास सुरुवात केल्याने ही कपात शक्य झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी विनाअनुदान एलपीजी सिलिंडर (१४.२ किलो ग्रॅम)चा नवीन दर ७0८.५0 ठेवला आहे. आतापर्यंत याचा दर ७५२ रुपये प्रति सिलिंडर होता.
बाजार दराने विकल्या जाणार्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात होण्याची ही सलग पाचवी वेळ आहे. ग्राहकाला वर्षाला १२ सिलिंडर अनुदानासह बाजारापेक्षा स्वस्त दरात दिले जातात. अजूनही दिल्लीत अनुदान असणार्या एलपीजी सिलिंडरची किंमत ४१७ रुपये आहे. यापूर्वी १ डिसेंबरला विनाअनुदान सिलिंडरची किमत ११३ रुपयांनी कमी करण्यात आलेली होती. मागील सहा महिन्यांत विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीत २१४ रुपये प्रति सिलिंडरपर्यंतची कपात करण्यात आलेली आहे; परंतु अनुदान असणार्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत कुठलीही कपात करण्यात आलेली नाही.