मुंबई : रेल्वेला मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हटले जाते; परंतु हीच जीवनवाहिनी मुंबईकरांची मृत्यूवाहिनीदेखील बनत चालली आहे. दररोज १0 ते १२ प्रवाशांचा रेल्वेच्या विविध अपघातांमध्ये जीव जातो, तर अनेकजण गंभीर जखमी होतात. २00९ ते २0१२ या ४ वर्षांत १0 हजार ४१३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर १२ हजार २२७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जानेवारी ते ऑक्टोबर २0१४ या १0 महिन्यांत ३१00 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यावरून उपनगरीय रेल्वेने प्रवास करणार्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न किती महत्त्वाचा आहे, हे दिसून येते.
उपनगरीय रेल्वेच्या स्थापनेला सुमारे ६0 वर्षांहून अधिक काळ होऊन गेला आहे. उपनगरीय रेल्वेच्या मध्य रेल्वेमार्गावर सर्वात जास्त प्रवासी संख्या आहे. सुमारे १५0 किमीच्या पट्टय़ात मध्य रेल्वे विस्तारलेली आहे. सीएसटी-कसारा-कर्जत आणि पनवेलपर्यंत मध्य रेल्वे धावते. मध्य रेल्वे मार्गावर सर्वाधिक अपघातांची संख्या आहे. २00९ ते २0१२ या वर्षात एकट्या मध्य रेल्वेवर ७ हजार ८७६ प्रवाशांचा मृत्यू तर ५ हजार ९४२ प्रवासी जखमी झाले आहेत. २00५-0६ मध्ये मध्य रेल्वेमार्गावर ३0 लाख प्रवासी दररोज प्रवास करत होते; परंतु आता ही संख्या वाढून ४२ लाखांच्या पुढे गेली आहे. गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलमधून तोल गेल्याने, बाहेर लटकत असताना पोलचा धक्का लागल्याने, रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असताना, लोकल आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये राहणार्या गॅपमध्ये पडून अपघात होणार्यांची संख्या जास्त आहे.
पश्चिम रेल्वेमार्गावरदेखील अपघातांची संख्या जास्त आहे. परेवरील वांद्रे आणि अंधेरी या दोन स्थानकांत सर्वाधिक अपघात नोंदवले गेले आहेत. वांद्रे स्थानकात ३९४ प्रवासी, तर अंधेरी स्थानकात ३८४ प्रवासी विविध रेल्वे अपघातांमध्ये जखमी आहेत. त्याचबरोबर गोरेगाव, कांदिवली आणि विरार स्थानकांमध्येदेखील अपघातांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे.

२0१४ मधील अपघातात मृत्युमुखी
पुरुष २७२0,
महिला ३३७,
खांबाला धडकून ११.
रेल्वे रूळ ओलांडताना १६0३
गाडीतून पडून ६८0.
स्टेशननुसार मृत्यूचे प्रमाण कुर्ला ३६३,
ठाणे २९६,
सीएसटी ११७,
दादर १३५,
डोंबिवली १४८,
बोरिवली २६४,
वसई २५४,
चर्चगेट ४८.