मुंबईत अद्याप १0 लाख वृक्षांची गणना - ३६00 वृक्ष धोकादायक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 January 2015

मुंबईत अद्याप १0 लाख वृक्षांची गणना - ३६00 वृक्ष धोकादायक

मुंबई महापालिकेने नऊ महिन्यांपूर्वी सुरू केलेले वृक्षांचे सर्वेक्षण ५0 टक्के झाले असून आतापर्यंत तब्बल १0 लाख वृक्षांची गणना झाली आहे. त्यात २९८ विविध जाती-प्रजाती आढळल्या आहेत, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली. ही गणना करताना मुंबईत ठिकठिकाणी तीन हजार ६00 वृक्ष धोकादायक अवस्थेत आढळले आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

पालिकेने गेल्या वर्षी फेब्रुवारीत वृक्ष गणना सुरू केली असून, हे काम नागपूरच्या 'सार आयटी सर्व्हिसेस' या कंपनीला दिले आहे आणि त्यावर महापालिका दोन कोटी सात रुपये खर्च करत आहे. ओव्हल मैदानातून वृक्ष गणनेला सुरुवात झाली असून आतापर्यंत ५0 टक्के काम पूर्ण झाले आहे आणि हे काम 'सार आयटी'ला १२ महिन्यांत पूर्ण करायचे आहे, असे ते म्हणाले. वृक्षगणना करण्यासाठी नागपूरच्या या कंपनीने 'ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम' (जीपीएस) आणि 'जॉग्राफिकल' या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. एखादा वृक्ष कोणत्या विभागात आहे, ठरावीक विभागात कोणत्या जागी आहे याची अचूक माहिती मिळवण्यासाठी ही कंपनी अक्षांश आणि रेखांशांच्या मदतीने वृक्षाचे नेमके स्थान निश्‍चित करते. यामुळे वृक्षांची गणना पूर्ण झाल्यानंतर विविध जाती-प्रजातीचे वृक्ष कुठे आहेत याची सविस्तर माहिती चुटकीसरशी उपलब्ध होईल, असा दावा श्रीनिवास यांनी केला. 

Post Bottom Ad